OSCARS 2019 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

पाहा कोणत्या चित्रपटाला मिळाले किती पुरस्कार 

Updated: Feb 25, 2019, 11:04 AM IST
OSCARS 2019 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी title=

लॉस एंजेलिस : OSCAR 2019 चित्रपट विश्वात कलाकार आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागलेल्या पुरस्कार सोहळ्याचा थाट नुकताच पाहायला मिळाला. कलागुणांना वा देणाऱ्या चित्रपट कलेचा आणि त्या एका चित्रपटाला साकारणाऱ्या कलाकारांचा यंदाच्या ९१ व्या अकॅडमी पुरस्कार अर्थात मानाच्या ऑस्कर सोहळ्यात गौरव करण्यात आला. यामध्ये रोमा (Roma), ग्रीन बुक (Green Book), ब्लॅक पँथर (Black Panther) या चित्रपटांनी विशेष छाप पाडली. शिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचंया निमित्ताने ऑस्करच्या यादीत आणखी दोन नावं नव्याने जोडली  गेली. 

शंभरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात भावनांनाचा बांध फुटला, कोणी पुरस्कार स्वीकारत प्रियजनांना तो समर्पित केला. तर, सादरीकरणासाठी आलेल्या काहींनी सूत्रसंचालकाशिवाय झालेल्या या ऑस्करमध्ये टोलेबाजीही केली. अर्थात या साऱ्यामुळे ऑस्कर खऱ्या अर्थाने गाजला असंच म्हणावं लागेल. चला तर मग एक धावती नजर टाकूया यंदाच्या ऑस्कर विजेत्यांच्या संपूर्ण यादीवर 

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ग्रीन बुक 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अल्फोन्सो क्युअरॉन (रोमा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ओलिविया कोलमन (द फेव्हरेट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - रामी मालेक (बोहेमियन रॅपसडी)

सर्वोत्कृष्ट गीत - लेडी गागा, मार्क रॉन्सन, अँथनी रोसोमँडो, अँड्य्रू व्यॅट (शॅलो- अ स्टार इज बॉर्न)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - लुडविग गोरान्ससन (ब्लॅक पँथर)

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)- ब्लॅककेकेकेन्समन

सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)- ग्रीन बुक 

लाईव्ह ऍक्शन लघुपट- स्किन

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- फर्स्ट मॅन 

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट सब्जेक्ट)- पिरियड: एण्ड ऑफ सेंटेन्स

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- बाओ

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स 

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- महेर्शाला अली (ग्रीन बुक)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री -  रेजिना किंग (इफ बेल स्ट्रीट कुड टॉक)

सर्वोत्कृष्ट संकलन- जॉन ऑटमन (बोहेमियन रॅपसडी)

सर्वोत्कृष्ट परभाषीय चित्रपट- रोमा 

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण- बोहेमियन रॅपसडी

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन- बोहेमियन रॅपसडी

सर्वोत्कृष्ट छायांकन- अल्फोन्सो क्युअरॉन (रोमा)

सर्वोत्कृष्ट निर्मिती- ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट वेषभूषा- रुथ कार्टर (ब्लॅक पँथर)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा- व्हाईस 

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री (फिचर)- फ्री सोलो