मुंबई : ९०वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यात ‘द शेप ऑफ वॉटर’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान मिळाला.
९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि दिवंगत अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहीण्यात आली. अभिनेते शशी कपूर यांनी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये काही सिनेमात काम केलंय. त्यात ‘द हाऊसहोल्डर’, ‘शेक्सपिअर वल्लाह’, ‘द गुरू’, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘कस्टडी’ या सिनेमांचा समावेश आहे.
The Oscars paid tribute to our beloved Sridevi...#YourLegacyLivesOn
— vidya balan (@vidya_balan) March 5, 2018
९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा अनेक चांगले सिनेमे शर्यतीत होते तर कलाकारांच्या यादीतही दिग्गजच होते. कुणाला पुरस्कार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पुरस्कार सोहळ्यात ‘द शेप ऑफ वॉटर’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या सिनेमाला वेगवेगळ्या विभागात १३ नामांकने मिळाली होती. तर ‘द शेप ऑफ वॉटर’ या सिनेमाचे दिग्दर्शक Guillermo Del Toro यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या पुरस्काराच्या शर्यतीत अनेक दिग्गज कलाकार होते. मात्र, सर्वोत्कॄष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गॅरी ओल्डमन यांना ‘डार्केस्ट आवर’साठी देण्यात आलाय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फ्रेन्सिस मेक्टोरमेंड यांना ‘थ्री बिलबोर्ड्स ऑऊटसाईड इबिंग, मसूरी’ सिनेमातील भूमिकेसाठी देण्यात आलाय.