'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा

Orry makes shocking claims : ऑरीनं नुकतीच 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, त्यानं यावेळी त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2023, 03:17 PM IST
'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Orry makes shocking claims : पापाराझींचा आवडता सेलिब्रिटी आणि बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणि म्हणजेच ऑरीनं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी ऑरीनं या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सलमान खानसोबत त्याच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा केली. यावेळी ऑरीनं खुलासा केला की दोनवेळा त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय ऑरीनं हे देखील सांगितलं की हा प्रयत्न करणारे दोघेही त्याचे मित्र होते. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ऑरीनं वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा ऑरी स्टेजवर येतो आणि सलमानशी गप्पा मारत असतो. स्टेजवर ऑरीशी गप्पा मारत असताना सलमान खानं सांगितलं की ऑरीच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. सलमान खाननं पुढे ऑरीला या विषयी प्रेक्षकांना सविस्तर सांगण्यास सांगितले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑरीनं म्हटलं की एकदा हॅलोविह पार्टीत डान्स करत असताना, माझ्या मित्रानं मला धक्का दिला होता. त्याचं रील देखील व्हायरल झालं होतं. मी पडलो. खिडकी जवळ असलेल्या सोफ्याच्या मागे पडलो, माझा जीव देखील जाऊ शकत होता. कोणी याचा व्हिडीओ देखील बनवला होता. मी सगळ्यात आधी माझा फोन दिला, कारण त्यात पुरावा होता. हा व्हिडीओ शेअर करत ऑरीनं कॅप्शन दिलं होतं की 'आणखी एक दिवस, आणखी एक पार्टी आणि आणखी एक हत्येचा कट.' त्यानंतर त्यानं त्याच्यासोबत झालेल्या दुसऱ्या हत्येच्या प्रयत्नाविषयी सांगितलं. त्यात एका महिला मैत्रिणीनं त्याला दारू पाजली आणि टेरेसवर पूल पार्टीत एकटं सोडलं. त्यानं सांगितलं की मी पूलमध्ये बुडू शकतो होतो किंवा त्या रुममधून पडू शकत होतो. कारण मला लांबचंही कमी दिसतं, त्यात मी नशेत होतो. पण मी वाचलो आणि घरी आलो. मी त्या मैत्रिणीशी बोलत नाही. हा हत्येचा प्रयत्न आहे.' 

हेही वाचा : '41 वर्षांचा झालोय, आता कंबर दुखते...'; वाढत्या वयामुळे रणबीर कपूरकडून होत नाही 'हे' काम

ऑरीनं केलेल्या या वक्तव्यावर सलमाननं मस्करी करत म्हणाला की हा तर मर्डर आहे. असा आमचा मर्डर तर रोज होत असेल. आम्ही त्याकडे कधी लक्ष दिलंच नाही.

कोण आहे ऑरी?

ऑरीचं खरं नाव ओरहान अवतरमणि आहे. मुंबईत राहणारा ऑरी हा मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीचा स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तो रिलायंससोबत इंटरनॅशनल फॅशन ब्रॅंड्ससोबत कोलॅबरेशनला देखील लीड करतो. त्यामुळे तो प्रमोशन आणि मार्केटिंगसाठी सेलिब्रेटिंशी जोडलेला असतो. ओरहान हा मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीचा खूप चांगला मित्र आहे. एकत्र काम करत असल्यामुळे त्याची अनेक सेलिब्रिटींशी मैत्री झाली.