VIDEO: 'आपल्या सैनिकावर गोळी तिथूनच येते'; खिचडीफेम अभिनेत्याचे प्रेक्षकांना जाहीर आवाहन!

Khichdi 2 Movie : निर्माते आणि अभिनेते जमनादास मजेठिया यांचा 'खिचडी 2' मोठ्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. मात्र त्यानंतर हा चित्रपट लीक झाला आहे. याबाबत आता अभिनेते जमनादास मजेठिया यांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 26, 2023, 02:49 PM IST
VIDEO: 'आपल्या सैनिकावर गोळी तिथूनच येते'; खिचडीफेम अभिनेत्याचे प्रेक्षकांना जाहीर आवाहन! title=

Khichdi 2 : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुप्रिया पाठक, अनंग देसाई, वंदना पाठक, राजीव मेहता आणि जमनादास मजेठिया (Jamnadas Majethia) यांचा 'खिचडी 2' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आतिश कपाडिया यांनी केले आहे. खिचडी नंतर प्रेक्षक 'खिचडी 2' ची आतुरतेने वाट पाहत होते. रिलीज झाल्यानंतर 'खिचडी 2'ची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच आता चित्रपटातील प्रमुख कलाकार जमनादास मजेठिया यांनी प्रेक्षकांसाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) पोस्ट केला आहे. जमनादास मजेठिया यांनी प्रेक्षकांना पायरसीचे समर्थन न करण्याचे आवाहन केले आहे.

खिचडी 2 च्या पायरसीवरुन जमनादास मजेठिया यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. मजेठिया यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला दिल टूट गया असे कॅप्शनही दिलं आहे. व्हिडिओमध्ये, त्यांनी दर्शकांना आणि सरकारला पायरसी थांबवण्याची विनंती केली. कारण याद्वारे दहशतवादाचे समर्थन केलं जात आहे. 

काय आहे व्हिडीओमध्ये?

"मी लिफ्टमधून वर येत असताना एका व्यक्तीने मला तुमचा चित्रपट पाहिला खूप चांगला होता असे सांगितले. मी त्याला चित्रपट कुठे पाहिला असे विचारला तेव्हा त्याने फोनवर पाहिला असे सांगितले. फोनवर चित्रपट पाहू नका कारण ती पायरसी आहे आणि हे दहशतवादाला समर्थन देते. दहशतवादाला समर्थन देणे म्हणजे स्वतःही दहशतवादी बनण्यासारखं आहे. आपल्या देशाच्या सैनिकावर गोळी आणि बॉम्ब तिथूनच येतो. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन खिचडी चित्रपट पाहा. जर परवडत नसेल तर काही हरकत नाही. थोड्याच दिवसात चित्रपट मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. पण कोणताही चित्रपट असा पाहू नका. हे तुमच्या देशातील टॅलेंटला संपवतं. माझी तुम्हाला आणि सरकारला विनंती आहे की पायरसीला तोडण्यात यावं. जर देशावर प्रेम करत असाल तर हे करायलाच हवं," असं जमनादास मजेठिया यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jd Majethia (@jd_majethia)

खिचडी' ही टीव्हीवरील मालिका छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाली होती. या शोपासून निर्मात्यांनी 2010 साली 'खिचडी' चित्रपटाची निर्मिती केली होती, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता 13 वर्षांनंतर 'खिचडी 2-मिशन पंथुकिस्तान' रिलीज झाला आहे. पण 'खिचडी'पेक्षा हा चित्रपट खूपच कमकुवत आहे. चित्रपटांचा विचार केला जातो तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा थोड्या जास्त असतात. चित्रपट चांगला लिहिला असेल तरच प्रेक्षक अशा कथा स्वीकारतात. पण खिचडी 2 या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावलेली नाही.