'मी पण 70 तास बिझी असतो', नारायण मूर्तींच्या वक्तव्यावर Orry चा व्हिडीओ व्हायरल

नारायण मूर्तींनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'तरुणांनी 70 तास कामे करावे' असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे अनेक पडसाद सोशल मीडियावर उमटले. वेगवेगळ्या मंडळींनी यावर प्रतिक्रिया दिली. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो म्हणजे ऑरी म्हणजे आरहोन अवर्तमानी  (Orhan Awatramani). ऑरी देखील असाच कामामुळे बिझी असल्याचं त्याने सांगितलं. या व्हिडीओमुळे ऑरी चांगलाच ट्रोल झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 2, 2023, 05:12 PM IST
'मी पण 70 तास बिझी असतो', नारायण मूर्तींच्या वक्तव्यावर Orry चा व्हिडीओ व्हायरल  title=

Narayan Murty : नारायण मूर्तींनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'तरुणांनी 70 तास कामे करावे' असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे अनेक पडसाद सोशल मीडियावर उमटले. वेगवेगळ्या मंडळींनी यावर प्रतिक्रिया दिली. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो म्हणजे ऑरी म्हणजे आरहोन अवर्तमानी  (Orhan Awatramani). ऑरी देखील असाच कामामुळे बिझी असल्याचं त्याने सांगितलं. या व्हिडीओमुळे ऑरी चांगलाच ट्रोल झाला आहे. 

काय म्हणाला ऑरी?

जान्हवी कपूरचा ब्रेस्ट फ्रेंड आणि Orry या नावाने ओळखला जाणारा Orhan Awatramani कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. भारतातील मोठे व्यावसायिक नारायण मूर्ती तरुणांना 70 तास काम करण्याचा सल्ला देतात. यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता ऑरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर ऑरीचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो 'हार्ड वर्क' बद्दल बोलत आहे. त्याच बोलणं ऐकून लोकांना हसू आवरत नाही. एका मुलाखतीत ऑरी म्हणतोय की, मी भरपूर हार्ड वर्क करतो. त्यावर प्रश्न विचारण्यात आला की, तो 9 ते 5 काम करणारा मुलगा आहे का? यावर त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिलंय. 

ऑरीचा 'तो' व्हिडीओ

तो म्हणाला की, नाही मी स्वतःवर काम करतो. मी जिमला जातो. मी माझ्याबद्दल विचार करतो. कधीतरी योगा करतो, मसाज करून घेतो. मी हार्ड वर्क करतोय पण ते स्वतःवर आहे. ऑरीचा हा व्हिडीओ इतका व्हायरल होतोय की, लोकं म्हणतात की , नारायण मूर्तींनी याला खरा हार्ड वर्क सांगायलाच हवा. 

सुनील शेट्टी काय म्हणाला?

 हा काही वाद घालण्याचा विषय नाही. मी ज्या तऱ्हेने आजकाल आजूबाजूला परिस्थिती पाहतो आहे त्यावरून आपण नारायण मुर्ती यांच्या या निर्णयाचा विरोध करायला नको. तरूणांनी त्यांचा सल्ला ऐकवा. तुम्ही आधी त्यांचे हे म्हणणे नीट ऐकायला पाहिजे आणि त्याचे स्वत:हूनच आकलन करणे महत्त्वाचे आहे. मग त्यांना जे ठीक वाटेल ते त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी आधी त्यांचे हे म्हणणे ऐकावे आणि त्यावर विचार करावा. 

सुधा मूर्ती काय म्हणाले?

नारायण मूर्ती यांचा मेहनती व कष्टावर विश्वास आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आठवड्यातून 80 ते 90 तास काम केले आहेत. त्यामुळं नॉर्मल वर्किंग वीक कसा असतो हे ते पूर्णपणे समजलेले नाहीये. त्यांचा मेहनतीवर विश्वास आहे आणि त्यांनी त्यानुसारच त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतित केलं आहे. त्यांनी फक्त त्यांचा अनुभव मांडला आहे, असं सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केलं आहे.