कोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद

आर माधवननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 18, 2022, 02:53 PM IST
कोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आर. माधवन (R Madhvan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवननं 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) फ्लॉप होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आर माधवननं बॉलिवूड चित्रपट फ्लॉप (Bollywood Movies Flop) होण्याचं आणि दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. (South Superhit Films) 

आणखी वाचा : Shehnaaz Gill: शहनाज गिलकडून रिलेशनशिपच्या चर्चांवर सडेतोड उत्तर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर माधवन मुंबईत त्याचा आगामी चित्रपट ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ (Dhokha Round The Corner) या चित्रपटाच्या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमात हजर होता. त्यावेळी आर माधवन आतापर्यंत सहाच दाक्षिणात्य चित्रपट हिट झाल्याचे म्हणाला. 'काही मोजक्याच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट चांगलं काम करतात, असा विचार करणं चुकीचं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आतापर्यंत मोजकेच काही चित्रपट आहेत जे सुपरहिट ठरले आहेत. यात बाहुबली 1, बाहुबली 2, आरआरआर, पुष्पा, केजीएफ: भाग 1 आणि केजीएफ: भाग 2 हे चित्रपट आहेत. त्यामुळे त्याला आपण ट्रेंड म्हणू शकत नाही. चांगले चित्रपट प्रदर्शिद झाले तर ते नक्कीच हिट होतील, मग ते कोणत्याही भाषेत असो. प्रेक्षकांना चांगली कथा आहे असे कळल्यास ते नक्कीच चित्रपटगृहात जाणून चित्रपट पाहतील', असे आर माधवन म्हणाला. (Only 6 South Indian Movies Superhit) (Only 6 Tollywood Movies Are Superhit )

पुढे माधवन हिंदी चित्रपट फ्लॉप होण्याविषयी म्हणाला की, 'करोनानंतर, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे लोक ज्या प्रकारचे चित्रपट पाहतील, तसेच चित्रपट आपल्याला बनवावे लागतील. आपल्याला आणखी थोडे प्रगतीशील बनावे लागणार आहे.' (Bollywood Movie Being Flop)

दरम्यान, आर माधवनचा कुकी गुलाटी दिग्दर्शित ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर आर माधवनचा 'रॉकेट्री द नाम्बी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.