'एक दिवस अचानक ब्लँकेट...' झोपेत विकी कौशल करतो खूप खतरनाक गोष्ट भावाने सांगितलं मोठं सिक्रेट

विकी कौशल हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. विकीने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

Updated: Apr 21, 2024, 06:05 PM IST
'एक दिवस अचानक ब्लँकेट...' झोपेत विकी कौशल करतो खूप खतरनाक गोष्ट भावाने सांगितलं मोठं सिक्रेट title=

मुंबई : वेळेसोबत विक्की कौशलने इडस्ट्रीमध्ये स्वत:चं खूपच खास स्थान बनवलं आहे. यासोबतच सनीदेखील त्याच्या चाहत्यांचा फार लाडका आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' ते सॅम बहादुरपर्यंत, विक्कीला आत्तापर्यंत आपण उत्तम व्यक्तिरेखा साकारताना पाहिलं आहे. या दरम्यान सनीने आपल्या भावाशी जोडलेला एक असा खुलासा केला आहे. जो ऐकून प्रत्येकजण हैराण होत आहे. अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये विकी आणि सनी एकत्र दिसले होते. 

सनीने सांगितली विक्कीची वाईट सवय
द ग्रेट इंडियन कपिल शो दरम्यान सनी आणि विक्की गेस्ट बनून पोहचले होते. या दरम्यान सनीने विक्की कौशल झोपेत डोळे उघडे ठेवून झोपण्याच्या सवयीवरील पडदा उठवताना दिसला होता. सनी म्हणाला की, लोकं झोपेत बडबडतात मात्र विक्की तर परफॉर्मेंसच देतो. सनी म्हणाला, एकदा आम्ही दोन्ही भाऊ रूम शेअर करत होतो. काही वेळाने विकी उठला आणि त्याने सनीला पेपर संपल्याचे सांगितलं. भावाचे बोलणे ऐकून सनीला आश्चर्य वाटलं.

विक्कीच्या आईची होती अशी प्रतिक्रिया 
विकी कौशल पुढे म्हणाला,  त्याची आई वीणा कौशलला झोपेत बोलण्याच्या त्याच्या या सवयीबद्दल माहिती नव्हती. एके दिवशी तो आईसोबत झोपला असताना विकीने तिची पर्स कोणीतरी नेल्याचे ओरडायला सुरुवात केली. विकीचे बोलणं ऐकून आईने विचारलं कोण? विकी झोपेत अशाप्रकारेच बडबड करतो.  

व्हॅलेंटाईन डेवर म्हणाला असं काही  
विक्की कौशलला कपिलने व्हॅलेंटाइन डेबद्दलही विचारलं. या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेता म्हणाला की, कतरिनासोबतचा प्रत्येक दिवस खास असतो. लग्नाआधी दोघंही खास वेळ एकत्र घालवत असत आणि अजूनही करतात.बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. विकीने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विकी कौशल हा उरी – द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. सध्या विकी कौशल हा त्याचा आगामी 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.