'या' स्टारकिडची सगळेच उडवायचे खिल्ली, आज तोच आहे 3101 कोटींच्या संपत्तीचा मालक

Child Artist : या सेलिब्रिटी किडला लहानपणी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मात्र, त्यानं कधाच हार मानली नाही आणि आज तो इतक्या हजार कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 3, 2023, 04:07 PM IST
'या' स्टारकिडची सगळेच उडवायचे खिल्ली, आज तोच आहे 3101 कोटींच्या संपत्तीचा मालक title=
(Photo Credit : Social Media)

Child Artist : बॉलिवूडमधील असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांना लहाणपणापासून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तेव्हापासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्यानंतर त्या स्टारकिड्सना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. पण असं सगळ्या स्टारकिड्ससोबत होतं असं नाही. काही मुलांना लहाण असताना खूप बूली करण्यात आलं, त्यांची सतत मस्करी करण्यात आली आणि इतकंच नाही तर खिल्ली उडवण्यात आली. इतकंच नाही तर तो शाळेत जाण्यासाठी देखील घाबरायचा आणि आईच्या मागे जाऊन रडायचा. पण जेव्हा तो मोठा झाला आणि चित्रपटसृष्टीत आला तर त्यानं असं काम केलं की जगभरात त्याला सगळं जग पाहू लागलं. पहिल्याच चित्रपटातून त्यानं लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. तुम्हाला कळलं का की आम्ही कोणत्या स्टारकिडविषयी बोलतोय? नाही का? चला तर मग जाणून घेऊया कोण आहे तो स्टार किड. याच स्टार किडची आज 3101 कोटींची एकूण संपत्ती आहे.

हा स्टार किड 80 च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय असलेला लाइल्ड आर्टिस्ट होता आणि एका चित्रपटात तर त्यानं रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर त्यानं असिस्टंट दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. तर आज हाच मुलगा बॉलिवूडमधील ए लिस्चर अभिनेत्यांच्या यादीत आहे. या दुसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन आहे. हृतिकनं 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर त्याचा हा चित्रपट 2000 मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. या चित्रपटानं अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये 92 अवॉर्ड जिंकले. हा आजपर्यंतचा कोणत्या चित्रपटानं इतके अवॉर्ड जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. हृतिकनं त्याच्या या पहिल्याच चित्रपटातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव नोंदवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : पडद्यामागे राहून बिग बिंना घडवणारा त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन आज कुठंय?

हृतिक रोशन जेव्हा शाळेत होता तेव्हा त्याला सतत बूली करण्यात येत होते. त्याचं कारण तो अडखळत बोलायचा. त्यामुळेच शाळेत असताना लोक त्याची मस्करी करायचे. इतकंच नाही तर काही सिनीयर मुलांनी त्याची सायकल देखील तोडली होती. पण हृतिकनं हिंमत हरली नाही आणि याचा सामना केला. चित्रपटांमध्ये चाइल्ड आर्टीस्ट म्हणून काम केल्यानंतर त्यानं वडील राकेश रोशनच्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  तर हृतिकची एकूण नेटवर्थ ही आज 3101 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.