मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांची जोडी ही एकेकाळी लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. खरंतर त्या दोघांनी लग्नाचा निर्णय इतक्या लवकर घेणं हे सगळ्यांसाठी धक्कादायक होते. त्यांच्या मैत्रिची सुरुवात ही चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी सैफनं असं काही केलं होतं की अमृतााला आश्चर्य झालं होतं.
या दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अमृता एक मोठी स्टार होती, तर सैफ स्ट्रगलर होता आणि त्यानं पहिल्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं. चित्रपटाच्या फोटोशूटच्या सेटवर राहुल रवैलनं त्याची खास मैत्रिण अमृताला फोन केला आणि तिला तेथे बोलावले. तेव्हा अमृताला पाहून सैफ तिच्याकडे एकटक पाहू लागला. अमृता ही सीनियर असूनही फोटोशूटच्या वेळी सैफनं तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. हे पाहून अमृताला आश्चर्य झालं आणि ती त्याच्याकडे रागात पाहत होती. (on first meeting saif ali khan placed his hand on amrita s shoulder read what was her reaction)
असं म्हटलं जाते की या पहिल्याच भेटीत सैफनं अमृताच्या हृदयावर अशी छाप सोडली की सैफ तिच्या लक्षात राहिला. त्यामुळेच सैफनं जेव्हा अमृताला डिनरसाठी बोलावले होते. दोघांची ही दुसरी भेट होती आणि यानंतर त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. मग थोड्या दिवसात त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं.