"हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर...", महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा

OMG 2 akshay kumar : अक्षय कुमारच्या OMG 2 चं नवं पोस्टर प्रदर्शित. अक्षय कुमारला महादेवाच्या लूकमध्ये पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्याला इशारा... हिंदू धर्माविषयी उलट सुलट दाखवलं तर याद राखा... अक्षय कुमारचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 3, 2023, 01:30 PM IST
"हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर...", महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा title=
(Photo Credit : Akshay Kumar Instagram)

OMG 2 akshay kumar  : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'OMG 2' मुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षयचे चाहते त्याच्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. अक्षयनं गेल्या महिन्यातचं त्याच्या या चित्रपटातील पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारिख सांगितली होती. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच अक्षयनं शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचा फस्ट लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरमुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. त्यावर नेटकरी वेगवेगळी प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयच्या लांब जटा, गळ्यावर भस्म लावला असून रुद्राक्षची माळ देखील आहे. अक्षय या पोस्टरमध्ये महादेवाच्या लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत अक्षयनं कॅप्शन दिलं आहे की "फक्त काही दिवसातच... 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात ओएमजी... लवकरच टीझर येणार तुमच्या भेटीत..."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षयनं शेअर केलेल्या या पोस्टरवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांच्या पसंतीस हे पोस्टर आलं आहे तर अनेकांनी पोस्टर पाहताच अक्षय आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला वॉरनिंग दिलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, अक्षय सर खूप सुंदर... अप्रतिम. दुसरा नेटकरी म्हणाला, देवावर विश्वास ठेव, तू शिवचा दास आहेस. टायगर श्रॉफ या पोस्टवर कमेंट करत पाजी असं म्हणतं फायर इमोटीकॉन वापरलं आहे. 

हेही वाचा : "मुलांना भारतीय शाळेत शिकवायचेच नव्हते...", Sunil Shetty चा मोठा खुलासा

काही नेटकऱ्यांनी अक्षयला इशारा दिला आहे. एक नेटकरी म्हणाला, "अक्षय सर तुम्ही माझे आवडते कलाकार आहात. मी तुमचे सगळे चित्रपट पाहिले आहेत... पण जर तुमच्या या चित्रपटात हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवण्यात आलं तर अक्षय सर तुमच्यासाठी काही ठीक राहणार नाही. कृपया हिंदू धर्मावर विनोद करू नका... जय श्री राम..." दुसरा नेटकरी म्हणाला, "हिंदू धर्माचा अपमान किंवा विनोद केला तर याद राख." तिसरा नेटकरी म्हणाला, "तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की चित्रपटात तुम्ही हिंदू धर्मावर विनोद करणार नाही." आणखी एक नेटकरी म्हणाला, "खरं सांगायचं झालं तर या चित्रपटात हिंदू धर्माविषयी काही चुकीचं दाखवलं तर काही करं नाही. हे बॉलिवूडचे हिंदू धर्मावर उलटं सुटलं काहीही दाखवतात. हिंदूंवर चित्रपट बनवतात तर काहीही दाखवतात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्याला चुकीचं ठरवू नका. जय महाकाल." आणखी एक नेटकरी म्हणाला, "आशा आहे की महादेवावर असलेला हा चित्रपट सनातन धर्मात असलेल्या आस्था आणि मर्यादांमध्ये असेल."

अक्षय कुमारचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी बोलायचे झाले तर त्यानं 'हाउसफुल 5' या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय Soorarai Pottru च्या हिंदी रीमेकमध्ये देखील अक्षय दिसणार आहे. त्याशिवाय 'बडे मियां छोटे मियां', 'जॉली एलएलबी 3', 'हेरा फेरी 3' आणि 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' देखील आहेत. तर अक्षय 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात देखील अक्षय दिसणार आहे.