मुंबई : 'बिग बॉस' सीझन ११ ची विजेती ठरलेली अभिनेत्री सिल्पा शिंदे सध्या चर्चेत आहे. त्यातच एका वादग्रस्त व्यक्तीमुळे तीही वादात सापडलीय.
बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये सर्वात वादग्रस्त ठरलेले व्यक्ती म्हणजे ओम स्वामी... त्यांनी शिल्पाशी आपलं जुनं नातं असल्याचा दावा केलाय. इतकंच नाही तर शिल्पा आपल्यामुळे या कार्यक्रमात विजयी ठरल्याची प्रतिक्रियाही ओम स्वामींनी दिलीय.
शिल्पा माझी धर्मपुत्री आहे. मी शिल्पाला 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी समजवावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तिचा भाऊ आशु माझ्यामागे पडला होता, असं ओम स्वामींचं म्हणणं आहे.
शिल्पाच्या म्हणणं होतं की लोक मला चुकीचं समजतात... या कार्यक्रमात जाऊन माझी प्रतिमा आणखीनच चुकीची होईल. परंतु, तेव्हा मी ओम स्वामी असल्याचं तिला समजावलं... या कार्यक्रमानं माझी इमेज अगोदरच चुकीची बनवलीय... परंतु, असं यावेळी होणार नाही, असा विश्वास मीच तिला दिला असंही ओम स्वामींचं म्हणणं आहे.
इतकंच नाही तर शिल्पासोबत काहीही वाईट घडता कामा नये, असं मी स्वतंत्ररित्या सलमानलाही समजावलं होतं, असा दावाही ओम स्वामींनी केलाय.