मुंबई : मॉडेल होण्यासाठी तुम्हाला आखीव रेखीव अंगकाटी तसेच, भलीमोठी उंची असावी लागते असा सर्वसाधारण समज. पण, हा समज म्हणजे काही नियम नाही बरं. एक अशीही मॉडेले आहे. जिने हे सर्वच नियम मोडीत काढले आहेत. तरीही, मॉडेलिंग विश्वात तिची दखल घेतली जाते. केवळ दखलच घेतली जात नाही. तिला कोट्यवधी लोक फॉलोही करतात. इतकेच नव्हे तर,जगातील सर्वात छोटी मॉडेल अशी तिची खास ओळखसुद्धा आहे. ही सर्व चर्चा चालते अर्थातच मीट ड्रू प्रेस्टा हिच्याबद्धल.
मीट ड्रू ही एक अशी मॉडेल आहे. जिची उंची केवळ 3 फूट 4 इंच इतकी आहे. प्रचलीत मॉडलेपेक्षा कितीतरी पटीने उंची कमी असूनही मीटच्या करिअरटा ग्राफ वाढता आहे. रीनो शहरातील राहणारी मीटने आश्चर्यकारकरित्या मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यात ती यशस्वीही झाली.
मीट ड्रू प्रेस्टा सांगते की, माझ्यासाठी एक काळ असाही होता की, माझ्या उंचीमुळे मी स्वत:ला कमी लेखत असे. मला स्वत:ची लाज वाटत असे. तसेच, मी स्वत:ला दरवाजा बंद करून घरात कोंडून घेत असे. मात्र, माझ्यासाठी एक सोनेरी दिवस आला. मला मॉडेलिंग क्षेत्रात संधी मिळाली. मीट ही अशा लोकांसाठी प्रेरणादाई आहे. जे लोक स्वत:ला कमी लेखतात.
मीट ट्रूचे वैशिष्ट्य असे की, सोशल मीडियावर ती भलतीच चर्चेत असते. इतकेच नव्हे तर, तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोट्यवधी लोक तिचे फॉलोवर आहेत. ती इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, युट्यूबर सातत्याने अॅक्टीव्ह असते. युट्यूबवरही तिचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत.