बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahanकडून Yash Dasgupta सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर...

पती निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्ताशी जोडले जाऊ लागले.

Updated: Sep 4, 2021, 08:16 PM IST
बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahanकडून Yash Dasgupta सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर... title=

मुंबई : पश्चिम बंगालची सुंदर अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँला ती गर्भवती झाल्यापासून तिच्या मुलाच्या वडिलांबद्दल विचारले जात आहे. पण नुसरतने एकदाही या प्रकरणात कोणाचाही उल्लेख केला नाही. परंतु नुसरतच्या नवऱ्यासोबतच्या झालेल्या दुराव्यानंतर तिचे नाव टीएमसी खासदार यश दासगुप्ता यांच्याशी जोडले जात आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पती निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्ताशी जोडले जाऊ लागले. पण अभिनेत्रीने त्यांच्या नात्यावर कधीही शिक्कामोर्तब केले नाही. परंतु यश नेहमी नुसरतसोबत प्रत्येक प्रसंगी उभा राहिला. गरोदरपणातही यशने नुसरतला एकटे सोडले नाही.

एवढेच नाही, तर नुसरतच्या मुलाची आनंदाची बातमी खुद्द यश दासगुप्ता यांनीही शेअर केली होती. इतका काळ आपल्या नात्याला लपवल्यानंतर आता असे दिसत आहे की, नुसरतला या नात्याबद्दल सर्वांना काहीतरी सांगायचे आहे, कारण तिने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ त्यांच्या या नात्याकडेच बोट दाखवत आहे.

नुसरत जहाँने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका चाहत्याने बनवलेला व्हिडीओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील त्यांच्यातील ती केमेस्ट्री दिसेल. नुसरतच्या या व्हिडीओमध्ये तिला आणि यशला मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.

फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते, 'यीशान के जन्म के लिए यशरत को मुबारकां.' पुढे त्या फॅनने लिहिले की, "तुमच्या मुलाची एक पण झलक पाहायला मिळाली नाही. म्हणून मी हा एक छोटासा व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामुळे फॅन्स की, तरफ से यीशानला खूप साऱ्या शुभेच्छा."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर्षी जून महिन्यात नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या हेडलाईन्समध्ये आल्या होत्या. त्याचवेळी यावर मौन तोडत नुसरतने निखिल जैनसोबतचे लग्न बेकायदेशीर ठरवले होते. यासह, निखिलने असेही सांगितले की, ती 2020 पासून वेगळी राहत आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, नुसरत गेल्या वर्षापासून बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.