न्यूड फोटोग्राफीचा ट्रेन्ड सुरुच; रणवीरनंतर 'या' अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट!

काहींना त्याचाच हा ट्रेण्ड स्विकारत अनेकांनी त्यांचेही न्यूड फोटोशूट केले आहे.

Updated: Jul 24, 2022, 10:48 AM IST
न्यूड फोटोग्राफीचा ट्रेन्ड सुरुच; रणवीरनंतर 'या' अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट! title=

Ranvir singh nude photoshoot: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रणवीर सिंगच्या फोटोशूटची. त्याच्या फोटोशूटवर अनेकांनी पोझिटिव्ह तसेच नेगेटिव्ह कमेंट्स दिल्या आहेत. काहींना त्याचाच हा ट्रेण्ड स्विकारत अनेकांनी त्यांचेही न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेता विष्णू विशालने अभिनेता रणवीर सिंगच्या ताज्या न्यूड फोटोशूटचा आधार घेतला आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. ट्विटरवर विष्णू विशालने बेडवर झोपताना स्वतःची न्यूड फोटोज पोस्ट केले आहेत आणि रणवीरला तो Well... joining the trend!असे म्हटले.

फोटो शेअर करताना विष्णूने खुलासा केला की हे फोटो त्याची पत्नी ज्वाला गुट्टाने क्लिक केले आहेत. त्याने पोस्टला कॅप्शन दिले, "Well... joining the trend! P.S. Also when wife @Guttajwala turns photographer..."  विष्णू बेडशीटने अर्धवट झाकलेला बेडवर झोपला होता. 

गेल्या आठवड्यात रणवीर पेपर मॅगझिनसाठी फोटोशूटसाठी न्यूड झाला होता. फोटोंमध्ये रणवीरने तुर्कीच्या कार्पेटवर पोज दिली आहे. एका दिवसानंतर रणवीरने त्याच्या ट्विटरवर फोटो शेअर केले. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना प्रियंका चोप्राने लिहिले, "major". परिणीती चोप्राने प्रतिक्रिया दिली. "F I R E".

रणवीरच्या या पोस्टवर मसाबा गुप्ता, अर्जून कपूर, अनुराग कश्यप आणि इतरही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

पायाला दुखापत होण्यापूर्वी विष्णूने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) या संस्थेसाठी क्रिकेटच्या मॅचेस खेळल्या आहेत यानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपली. त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आणि 'वेलेनु वंधुत्ता वेल्लईकरण', 'सिलुकुवरुपत्ती सिंगम' आणि 'रत्सासन' यांसारख्या काही चित्रपटांची निर्मिती केली. विष्णू नुकताच तामिळ चित्रपट 'एफआयआर रेडी'मध्ये दिसला होता.  आता तो 'मोहनदास' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.