लग्नाच्या कपड्यात रानू मंडल गायली गाणं; पुन्हा एकदा चर्चेत

 रानू मंडल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

Updated: Apr 14, 2022, 04:38 PM IST
लग्नाच्या कपड्यात रानू मंडल गायली गाणं; पुन्हा एकदा चर्चेत title=

मुंबई : एक प्यार का नगमा है हे गाणं गाऊन सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली  रानू मंडल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. रानू अनेकदा तिच्या आवाजामुळे चर्चेत असते. तर कधी तिच्या विचित्र वागण्यामुळे. आता नुकताच रानू मंडलचा एक लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती वधूच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रानू मंडल कच्चा बादाम हे गाणं गाताना दिसत आहे. जे काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरंतर, व्हिडिओमध्ये रानू तिच्या मधुर आवाजात भुवन बद्यकरचं 'कच्छा बदामत' गाणं गुणगुणत आहे. भुबननंतर आता राणूच्या आवाजातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये रानू मंडल लाल आणि हिरव्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिसत आहे आणि यासोबत तिने वजनदार सोन्याचे दागिने घातले आहेत. रानू मंडल ज्या पद्धतीने हे गाणं गात आहे, ते पाहून तिची खिल्लीही उडवली जात आहे आणि नेहमीप्रमाणे तिला ट्रोलही केलं जात आहे. व्हिडीओच्या शेवटी राणू मंडलसोबत एक व्यक्तीही दिसत आहे. मात्र ती कोण आहे याबाबत व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सुमारे दोन वर्षांपूर्वी रानू मंडल पहिल्यांदा राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाताना दिसली होती. या गाण्यानंतर रानू सोशल मीडिया सेन्सेशन बनली आणि सर्वत्र चर्चेत आली. यानंतर रानू अनेक शोमध्ये देखील दिसली. अगदी प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने तिला तेरी मेरी हे गाणं रेकॉर्ड करायला लावलं. पण नंतर हळूहळू रानूच्या वागण्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आणि ती सोशल मीडियावर रोज ट्रोलही होऊ लागली.