लेकीच्या पायगुणामुळे Kapil Sharma चं सर्वात मोठं स्वप्न अखेर पुर्ण...

कॉमेडियन कपिल शर्माचे पुढील प्रोजेक्टसचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Mar 5, 2022, 07:11 PM IST
 लेकीच्या पायगुणामुळे Kapil Sharma चं सर्वात मोठं स्वप्न अखेर पुर्ण... title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचे पुढील प्रोजेक्टसचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

लेखिका-निर्माता-दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या चित्रपटात कपिल डिलिव्हरी फूड रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कपिल अजूनही एका चित्रपटावर काम करत आहे तर दुसरीकडे निर्माता विपुल डी. शाह यांनीही कॉमेडियनशी संपर्क साधल्याचं समजतंय.

कपिल शर्माचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे, कॉमेडी शो नंतर नेटफ्लिक्स प्रोजेक्ट आणि आता दोन बॅक टू बॅक चित्रपट कॉमेडियनच्या वाट्याला आले आहेत.कपिल शर्मा लवकरच एका मोठ्या आणि रोमांचक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

चित्रपट निर्माता विपुल डी. शाह यांनी कपिल शर्माला त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधला आहे. या प्रकल्पाबाबत कपिल आणि चित्रपट निर्मात्यामध्ये बोलणी सुरू आहेत.

बोललं जात आहे की, मुलींच्या पायगुणामुळे आता कपिलकडे कामाची रांग लागत आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कपिल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, विपुल डी. शाह यांचा नवा प्रोजेक्ट कॉमेडीवर आधारित असेल. चित्रपटाच्या नावाबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी किंवा कपिल शर्माने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.