VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरण

Deepika Padukone With Her Care Taker : दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, यावेळी चर्चा ही दीपिकाची नाही तर तिच्या केअर टेकरची आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 1, 2024, 12:52 PM IST
VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरण title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padukone With Her Care Taker : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आई होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात रणवीर आणि दीपिकानं ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते हे आनंदी आहेत. मात्र, त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिचं बेबी बंप दिसत नाही यामुळे ट्रोल करण्यातं आलं. आता दीपिका ही फॅमिली डिनरवर गेली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी व्हिडीओत दिसणाऱ्या तिच्या बेबी बंपनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

रणवीर सिंग हा सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट प्री-वेडिंगमध्ये सहभागी झाला आहे. तर दीपिका ही तिच्या कुटुंबासोबत आणि केयर टेकरसोबत रेस्टॉरंटमध्ये दिसली. मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये दीपिका दिसली. यावेळी दीपिकानं काळ्या रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केला आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या व्हिडीओत दीपिकाचा बेबी बंप दिसतोय. पण व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिच्यातील काही चुका काढताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की दीपिका प्रेग्नंट वाटत नाही आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की 'दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो दिसतोय. तिला नक्कीच मुलगा होणार.' तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाच्या केअरटेकरसाठी काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांनी म्हटलं की 'दीपिकानं एवढ्या कमी वयाची डोमेस्टिक हेल्प ठेवली हे वाईट वाटतंय. तर तिची मुलगी तिचं सामान देखील उचलते. दीपिका एका अडल्ट हेल्परला अफोर्ड करू शकत नाही का?' तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाच्या बेबी बंपला 'क्यूट' म्हटलं आहे. 

हेही वाचा : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...

दरम्यान, एप्रिल महिन्यात जेव्हा लोकांना दीपिकाचं बेबी बंप दिसलं नाही तेव्हा अनेकांनी दावा केला की ती सरोगसीच्या मदतीनं आई होते. पण काही दिवसांपासून जेव्हा दीपिका स्पॉट झाली तेव्हा तिचं बेबी बंप नेटकऱ्यांना दिसलं. तर तेव्हा अनेकांनी म्हटलं की तिनं उशी लावली आहे. त्यासोबत नेटकरी विविध गोष्टी बोलू लागले होते. पण आता सतत समोर येणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना त्यांचं उत्तर मिळालं आहे. सध्या रणवीरसोबत नसल्यानं दीपिका स्वत:ची काळजी घेताना दिसते.