अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...

Malaika Arora and Arjun Kapoor BreakUp :  अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराची प्रतिक्रिया...

दिक्षा पाटील | Updated: Jun 1, 2024, 10:24 AM IST
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Malaika Arora and Arjun Kapoor BreakUp :  बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची चर्चा नुकतीच सुरु झाली आहे. काल त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाला असून त्यांनी त्यांचं पाच वर्षांचं नातं संपवल्याचं म्हटलं. पण या सगळ्या चर्चांमध्ये आता त्यांच्या मॅनेजरनं वक्तव्य केलं आहे. त्यानं सांगितलं की या सगळ्या अफवाह असून ते अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत. 

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2019 मध्येच त्या दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृत केल्यापासून सगळे त्यांना टार्गेट करत होते. या सगळ्यात आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अर्जुनचं एक खास नातं आहे. तर त्या दोघांच्या मनात आजही एकमेकांसाठी प्रेम आहे. तर त्यांच्या या नात्यावर कोणालाही काहीही बोलण्याची परवानगी देणार नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'इंडिया टुडे'नं मलायकाच्या मॅनेजरशी या संबंधीत विचारण्यासाठी संपर्क केल्यानं त्यानं या बातमीस नकार दिला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर तो म्हणाला की 'नाही, नाही, या सगळ्या अफवाहं आहेत. 2018 मध्ये तो दोघं रिलेशनशिपमध्ये आले आणि 2019 मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याविषयी सगळ्यांना सांगितलं. त्यांच्या या नात्याला बराचवेळ झाला असून त्यात ते आनंदी आहेत.' मलायकाच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांसोबत रिलेशनशिपची बातमी शेअर केली होती. 

हेही वाचा : 'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट

बॉलिवूड आणि अर्जुन हे दोघेही बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांविषयी पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्ट या तितक्याच चर्चेत देखील असतात. रिलेशनशिपमध्ये आल्यापासून ते दोघं एकमेकांच्या कुटुंबासोबत देखील दिसतात. दरम्यान, मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा ही पहिल्यांदा झालेली नाही तर या आधी देखील अनेकदा झाली आहे. त्यानंतर मात्र, ते दोघं काहीही न बोलता एकत्र स्पॉट झाले आणि त्यांच्या ब्रेकअपच्या अफवाह सुरु संपल्या. यावेळी आता मलायकाच्या मॅनेजरनं याविषयी माहिती दिली आहे. तरी देखील त्या दोघांच्या चाहत्यांना थोडी चिंता असून ही आशा आहे की त्यांच्यात काही वाद वगैरे नसतील आणि ते दोघं एकत्र असतील.