'भारत'मध्ये सलमान खानसोबत झळकणार नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेही सध्या 'दिलबर' या सुपरहीट गाण्यामुळे चर्चेमध्ये आहे.

Updated: Jul 25, 2018, 06:42 PM IST
'भारत'मध्ये सलमान खानसोबत झळकणार नोरा फतेही title=

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या 'दिलबर' या सुपरहीट गाण्यामुळे चर्चेमध्ये आहे. 'सत्यमेव जयते' या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच नोरा आणि तिच्या गाण्यामुळे चर्चा रंगली आहे. युट्युबवर अवघ्या काही दिवसातच या गाण्याला सुमारे 1 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा फतेहीच्या बेली डान्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

'भारत'मध्येही झळकणार नोरा फतेही  

काही मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या 'भारत' चित्रपटामध्ये नोरा फतेही झळकणार आहे. या चित्रपटामध्ये नोरा केवळ एक डान्सर नसून महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

'भारत' चित्रपटामध्ये नोरा फतेही एका विदेशी मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये माल्टाच्या लॅटिनो गर्लची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे. 80 च्या दशकातील एक खास भूमिका नोरा साकारणार आहे. 

कोरियन चित्रपटाचा रिमेक 

'भारत' हा कोरियन सिनेमा ‘ऑड टू माई फादर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर दिशा पटनी आणि प्रियंका चोप्रा देखील झळकणार आहे.  

नोरा फतेही सैफ अली खानसोबत 'बाजार' चित्रपटामध्येही झळकणार आहे. सोबतच एम टीव्हीवरील ‘डेटिंग इन द डार्क’ या शोचं सूत्रसंचालन करणार आहे.