खरंच नोरा फतेही प्रेग्नेंट? अभिनेत्रीच्या खास व्हिडीओतून सत्य समोर

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.  

Updated: Jul 8, 2022, 03:05 PM IST
खरंच नोरा फतेही प्रेग्नेंट? अभिनेत्रीच्या खास व्हिडीओतून सत्य समोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी हॉट आणि ग्लॅमरस फोटो, तर कधी जबरदस्त डान्समुळे नोरा फकेही सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ज्या कारणांमुळे नोरा फतेही चर्चेत आली आहे, ते चाहत्यांना चकीत करणारं आहे. गेल्या काही दिवसांपासून नोर प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण एका व्हिडीओमुळे रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोरिओग्राफर मर्जी, अभिनेत्री नितू कपूर आणि नोरा प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या वेदनांबद्दल सांगताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये मर्जी म्हणतो, 'आम्ही प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या वेदनांविषयी बोलत आहोत, तर दुसरीकडे नोरा स्वत: कडे बघण्यात व्यस्त आहे.' यावर उत्तर देत नोरा बोलते, 'कारण मी प्रेग्नंट नाही.' यावर मर्जी बोलतो की 'संपूर्ण जगाला ही माहिती देण्यासाठी धन्यवाद.'

सध्या नोराचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नोरा सध्या डान्स दिवाने ज्युनियर हा रिअॅलिटी शो जज करते आहे. शोमध्ये तिच्यासोबत नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्झी दिसत आहेत.