Nora Fatehi on Bollywood Couples : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच डान्स आणि पोस्टमुळे ती चर्चेत आली नाही. तर एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नोरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेलिब्रिटी कपल्सविषयी एक नवा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की त्यापैकी अनेक लोक आहेत जे लोकांच्यासमोर ते एकत्र असल्याचं दाखवतात. त्यांनी सांगितलं की सेलिब्रिटी हे कॅलक्युलेटिव्ह आहेत. ते काम आणि खासगी आयुष्याला एकत्र करतात आणि त्यामुळे ती निराश होतात.
नोरानं ही मुलाखत रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टवर दिली आहे. नोरा म्हणाला की दबंग शिकारी आहेत हे, ते फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी तुमचा वापर करतात. ते माझ्यासोबत नाही करु शकत... हेच कारण आहे की तुम्ही मला मुलांसोबत फिरताना किंवा डेट करताना दिसत आहे. पण मी पाहिलं की हे समोर होतोय. चित्रपटसृष्टीत दिखावा करण्यासाठी लग्न करतात. लोकं त्यांच्या पत्नीचा किंवा पतीचा वापर नेटवर्किंगसाठी आणि पैशांसाठी करतात. ते विचार करतात की 'मी त्यांच्याशी लग्न करायला हवं म्हणजे ते नेटवर्किग, आर्थिक फायदा आणि इंडस्ट्रीमध्ये पावर फूल राहू शकतो. त्यांचे काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर चांगलं काम करत आहेत. त्यामुळे मला त्या लाटेवर प्रवास करायचा आहे.'
त्यानंतर तिनं पुढे सांगितलं की "हे सगळं पैसे आणि लोकप्रियता मिळावी यासाटी येतात. हे मुलं आणि मुली पैसे, लोकप्रियता आणि पावरसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. अशा कोणत्या व्यक्तीशी लग्न करतात ज्याच्यावर ते प्रेम देखील करत नाहीत आणि मग अनेक वर्ष त्याच्यासोबत राहतात. आमच्या इंडस्ट्रीमध्ये हेच चुकीचं करतात. त्यांना हे माहित नसतं की त्यांचं करिअर कुठे जाईल. त्यामुळे त्यांना कोणत्या बॅकअप प्लॉनची गरज आहे. प्लान ए, प्लान बी आणि प्लान सी."
हेही वाचा : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?
नोरा विषयी बोलायचं झालं तर तिचा जन्म हा कॅनडाला झाला. तर ती लहाणाची मोठी मोरक्कोमध्ये झाली. तिनं 2014 मध्ये 'रोर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर तिनं 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'सत्यमेव जयते' सारख्या चित्रपटांमध्ये डान्स नंबरसाठी ओळखली जाते. तर नोरा 'स्ट्रीट डांसर 3डी' मध्ये वरुण धवनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तर 'बाटला हाउस' या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.