नोरा फतेहीचा रेट्रो लुक आला समोर, फोटो होतायत व्हायरल

नोराचा अजबच तोरा, आता या वेशात अवतरली, तुम्ही फोटो पाहिलेत का?

Updated: Sep 9, 2022, 09:18 PM IST
नोरा फतेहीचा रेट्रो लुक आला समोर, फोटो होतायत व्हायरल  title=

मुंबई : 'दिलबर गर्ल' नोरा फतेही (Nora Fatehi) ही नेहमीच तिच्या डान्स आणि बोल्ड लुकमध्ये चर्चेत असते. मात्र प्रथमच तिने आपली संपुर्ण स्टाईल बदलली आहे. आणि ती रेट्रो लुकमध्ये समोर आली आहे. तिचा रेट्रो लुक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

नोरा फतेही (Nora Fatehi) नुकतीच 'झलक दिखला जा'च्या नवीन सीझनच्या सेटबाहेर दिसली होती. यावेळी ती रेट्रो लुकमध्ये दिसली होती. नोरा फतेहीचा हा रेट्रो लूक अप्रतिम दिसत आहे. नोराने जबरदस्त साडी परिधान केली आहे. तसेच तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने हाय पोनीटेल आणि चमकदार मेकअपसह लूक पूर्ण केला.

नोराने (Nora Fatehi) पुन्हा एकदा तिच्या लूकने फॅन्सची मने जिंकली आहेत. फॅन्स तिच्या या लूकच्या प्रेमात पडले आहेत. साडीतील नोराचा हा लूक पाहून तुम्हालाही नशा चढेल. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान करण जोहर आणि माधुरी दीक्षितसोबत नोरा फतेही (Nora Fatehi) या सीझनला जज करत आहे, तर मनीष पॉल या शोचा होस्ट आहे. या शोमध्ये एकेकाळी नोरा फतेही स्पर्धक म्हणून आली होती पण आज ती त्याच शोला जज करत आहे. ही तिच्या चाहत्यांसाठी मोठी बाब आहे.