Nikki tamboli या मुलाच्या प्रेमात, भर सेटवर काय केलं पाहा?

 प्रतीक सहजपालला काहीच समजत नाही आणि तो फक्त 'हम्म' एवढंच उत्तर देतो. 

Updated: Mar 14, 2022, 12:08 PM IST
 Nikki tamboli या मुलाच्या प्रेमात, भर सेटवर काय केलं पाहा? title=

मुंबई : 'द खतरा खतरा'हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियासोबत  'द खतरा खतरा'मध्ये मनोरंजन करताना दिसणार आहे.

हा शो OTT वर प्रीमियर होणार आहे, ज्यामध्ये अनेक टीव्ही सेलिब्रिटी हाय-व्होल्टेज ड्रामासह आव्हानात्मक कार्य पूर्ण करताना दिसतील.

'द खतरा'च्या प्रोमोमध्ये करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, पुनीत पाठक आणि निक्की तांबोळी यांच्यासह अनेक सेलेब्स शोमध्ये धमाल करताना दिसतील.

शोमधील एका टास्कसाठी निक्की तांबोळीला बिग बॉस 15 फेम प्रतीक सहजपाल सोबत एकत्र बांधल्याचं दिसणार आहे. तेथे मास्टर हर्ष आणि भारती सिंग या दोघांनाही नियंत्रित करताना दिसणार आहे.

द खतरा या टास्कमध्ये, भारती अभिनेत्री निक्की तांबोळीला विचारेल की तिला प्रतीक सहजपालसोबत दुसऱ्या डेटवर जायचे आहे का? या प्रश्नावर निक्की असे म्हणताना दिसणार आहे की, मला प्रतीकसोबत डेटवर जायचे नाही, मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निकीच्या या विधानामुळे आता निक्की प्रतीकवर प्रेम करते अशी चर्चा देखील सुरु झाली आहे.निक्की तांबोळीचा प्रस्ताव ऐकल्यानंतर भारती सिंग प्रतीक सहजपालला विचारते की, तिच्या प्रस्तावावर तुझं उत्तर काय आहे. प्रतीक सहजपालला काहीच समजत नाही आणि तो फक्त 'हम्म' एवढंच उत्तर देतो.