Lohri Celebration : लग्नानंतरचा पहिल्या सणाला कतरिनाला पतीकडून खास भेट

विकीनं चाहत्यांच्या भेटीला त्यांच्या या सेलिब्रेशनमधील काही खास क्षण आणले.   

Updated: Jan 14, 2022, 10:02 AM IST
Lohri Celebration : लग्नानंतरचा पहिल्या सणाला कतरिनाला पतीकडून खास भेट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री Katrina Kaif आणि Vicky Kaushal यांनी लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण नुकताच एकत्र लाजरा केला. हा सण म्हणजे लोहरी. पंजाब प्रांतात अतिशय महत्त्वं असणाऱ्या या सणाचा आनंद या नवविवाहित दाम्पत्यानंही घेतला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत विकीनं चाहत्यांच्या भेटीला त्यांच्या या सेलिब्रेशनमधील काही खास क्षण आणले. 

लोहरीच्या सेलिब्रेशनसाठी कॅटनं लाल रंगाच्या सलवार- कमीज अर्थात पंजाबी सूटला पसंती दिली होती. तिचा हा लूक अतिशय सोबर आणि तिताकाच लक्षवेधी होता. 

विकी मात्र यावेळी अगदीच कॅज्युअल लूकमध्ये दिसला.  

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत विकीनं हा सण नेमका कसा साजरा करण्यात आला याची झलक सर्वांपर्यंत पोहोचवली. जिथं ते एकमेकांसोबतचे हे क्षण आनंदानं जगताना दिसले.

कतरिनासाठी लग्नानंतरच्या या क्षणी मिळालेली खास भेट म्हणजे हा आनंदच असावा यात शंका नाही. 

कतरिनानंही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लोहरीचे काही फोटो शेअर केले. 

व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सणावाराला आपल्या नात्याला वेळ देत आणि काही खास क्षणांचा आनंद घेत जणू या दोघांनी एका सुरेख पर्वाची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, सध्याच्या घडीला कतरिना आणि विकी ही जोडी चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी जाऊन बसली आहे. 

या दोघांचीही केमिस्ट्री आणि त्यांच्या नात्यातील काही खास क्षण पाहता जणू आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जीवनातील आनंद आपण अनुभवतोय अशीच भावना चाहत्यांच्या मनात असते.