Looop Lapeta मध्ये दिसला तापसीचा सर्वात हॉट लूक, ट्रेलरने उडवली खळबळ

तापसीचा हॉट लूक, सर्वत्र तिच्या लूकची चर्चा  

Updated: Jan 14, 2022, 09:42 AM IST
Looop Lapeta मध्ये दिसला तापसीचा सर्वात हॉट लूक, ट्रेलरने उडवली खळबळ  title=

मुंबई :  अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि अभिनेता राज भसीन (Tahir Raj Bhasin) स्टारर 'लूप लपेटा' चित्रपटाचा ट्रेलर गुरूवारी रिलीज करण्यात आला.  तापसी पन्नूचा हा असा चित्रपट आहे, ज्यामध्ये तिचा आतापर्यंतचा बोल्ड लूक समोर आलाय. 'लूप लपेटा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताचं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील बोल्ड सीनने सर्वत्र खळबळ माजवली आहे. 

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तापसी बॉयफ्रेंड सत्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, जेव्हा तो जुगाराच्या बोलीत लाखो रुपये हारतो. तेव्हा बॉयफ्रेंडची मदत करण्यासाठी तापसी पुढे येते. चित्रपटात तापसीच्या बॉयफ्रेंडची भूमिका राज भसीनने साकारली आहे. 

चित्रपट 'रन लोला रन' या जर्मन प्रायोगिक थ्रिलरवर आधारित आहे. चित्रपट दिग्दर्शक आकाश भाटियाने दिग्दर्शित केला आहे.  'लूप लपेटा' चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.

याआधी तापसीने 'पिंक', 'बदला', 'थप्पड' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलेची भूमिका साकरली आहे. आता 'लूप लपेटा' चित्रपटाच्या माध्यमातून तापसी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.