रटाळ मालिकांचा कंटाळा आलाय, सज्ज व्हा 'या' नव्या मालिकांसाठी

नव्या वर्षात काही नव्या सीरियल्स देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जुन्या सीरियल्सची जागा आता नव्या सीरियल्स घेणार आहेत. 

Updated: Jan 7, 2022, 08:54 PM IST
रटाळ मालिकांचा कंटाळा आलाय, सज्ज व्हा 'या' नव्या मालिकांसाठी title=

मुंबई : नव्या वर्ष नव्या उत्साहानं सुरू झालं आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रत्येक घरात संध्याकाळी टीव्ही पाहिला जातो मात्र आता सध्या वर्क फ्रॉम होम किंवा इतर काही कारणांमुळे टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय सीरियल म्हणजे जीव की प्राण अशी अवस्था. मात्र सध्या त्याच त्याच रटाळ सीरियल पाहून लोकही कंटाळले आहेत. 

नव्या वर्षात काही नव्या सीरियल्स देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जुन्या सीरियल्सची जागा आता नव्या सीरियल्स घेणार आहेत. या नव्या वर्षात कोणत्या नव्या सीरियल येणार आहेत जाणून घेऊया. 

TRP चा बादशहा म्हणून एका वर्षापासून 'अनुपमा' सीरियलकडे पाहिलं जातं. याशिवाय 'गुम है...' ही देखील सीरियल तेवढीच प्रसिद्ध आहे. देखील खूप पसंत केला जात आहे. बिग बॉस 15 शो संपल्यानंतर आता या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी पुन्गा नागीन सीरियल येत आहे. 

5 सिझनच्या यशानंतर आता पुन्हा एकदा एकता कपूर नागीन 6 सिझन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'बिग बॉस 15' शो संपल्यानंतर नागिन 6 लाँच होईल असे सांगितले जात आहे.

याशिवाय हुनरबाज देश की शान हा शो देखील लवकरच सुरू होणार आहे. करण जोहर, मिथुन चक्रवर्ती आणि रिणीति चोपडा या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. 22 जानेवारीपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. 

फना इश्क मे मरजावां ही सीरियल 24 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या शोची वेळ अद्याप समोर आली नाही. यया सीरियलची प्रतिक्षा अनेकांना आहे. यामध्ये काय नवीन स्टोरी असणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

धर्म योद्धा गरूड नावाची नवीन टीव्ही मालिका सुरू होणार आहे. या टीव्ही मालिकेत निर्भय वाधवा गरुडाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही देखील मालिका वेगळ्या धाटणीची असल्याने प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी अशा सर्वांनाच आहे.