'सारेगम'फेम रोहित राऊतची नवी इनिंग

 ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चे आयोजन लातुरमध्ये करण्यात आले होते.

Updated: Apr 25, 2018, 05:28 PM IST
'सारेगम'फेम रोहित राऊतची नवी इनिंग  title=

लातूर : सध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणाऱ्या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे. आपल्या अकदमीविषयी माहिती देताना रोहित म्हणतो, 'लातूरला संगीताचं ज्ञान असलेल्या चांगल्या गुरूंची किंवा टॅलेंटची कमतरता नाही आहे. पण तरूण प्रतिभेला गायन क्षेत्रात करीयर करताना कॉन्फिडन्स देण्याची आणि त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याची गरज असते. मुंबईसारख्या महानगरात येऊन छोट्या गावातली किंवा शहरातली मुलं बुजून जातात. प्रतिभा असून मागे पडतात. अशावेळी मुंबईत करीयर करायला जाताना त्यांना ग्रुमिंग करण्याची आवश्यकता असल्याचं मला भासलं. आणि मर्म म्युझिक अकादमीचा जन्म झाला' 

ह्या अकदामीचा शुभारंभ झाल्यावर ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चे आयोजन लातुरमध्ये करण्यात आले होते. रोहित म्हणतो, 'या कॉन्सर्टला रसिकांचा भरूभरून प्रतिसाद मिळाला. बऱ्याचदा असं होते की, कलाकार मोठा झाल्यावर तो जन्मगावी जाणे कमी करतो. तसं माझ्या बाबतीत होऊ नये, हा माझा यामागचा मुळं उद्देश होता. मला माझ्या मातीसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. रोहित राऊत फाऊंडेशनव्दारे मी अशा पद्धतीनं समाजाची परतफेड करण्याचा माझा प्रयत्न राहील'.