'बेशरम रंग 2.0' 'फायटर' मध्ये हृतिक आणि दीपिकाचा इंटिमेट सीन पाहाताच नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण

Deepika Padukone- Hrithik Roshan Intimate Scene : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या इंटिमेट सीननंतर नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 9, 2023, 01:56 PM IST
'बेशरम रंग 2.0' 'फायटर' मध्ये हृतिक आणि दीपिकाचा इंटिमेट सीन पाहाताच नेटकऱ्यांना आली रणवीर सिंगची आठवण title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padukone- Hrithik Roshan Intimate Scene :  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या 'फायटर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाल्यापासून इंटरनेटवर एकच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच दीपिका आणि हृतिक रोशन यांच्यात दिसलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चित्रपटाच्या टीझरनं सगळ्यांची मने जिंकली असली तरी देखील चर्चा ही मात्र, रणवीर सिंगची आहे. त्याचं कारण काय असू शकतं याची थोडी कल्पना तुम्हाला आलीच असेल. जर तुम्हाला कल्पना आली नसेल तर त्याचं कारण दीपिका आणि हृतिकमध्ये असलेली केमिस्ट्री आणि त्यांची इंटिमेट सीन आहेत. 

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचीच सर्वत्र चर्चा सुरु होती. दीपिका आणि हृतिक यांच्यात असलेली केमिस्ट्री आणि त्यांचे काही इंटिमेट सीन यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. एका नेटकऱ्यानं त्या दोघांच्या किसिंग सीनचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. ज्यात ते दोघे एकमेकांमध्ये गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. बीचवरच्या या सीनमध्ये दीपिकानं काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली आहे. तक हृतिक हा शर्टलेस असून त्यानं बेज रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. 

netizens remember ranveer singh after seeing deepika padukone and hrithik roshan

या टीझरवर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्या दोघांची जोडी सुंदर दिसत आहे असं सांगितले असून. एका नेटकऱ्यानं त्यावर कमेंट करत लिहिले की 'अखेर दीपिका आणि हृतिक स्क्रिनवर एकत्र आले. ते दोघं खूप हॉट दिसत आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रणवीरनं त्याच्या पंजाबी गाण्याची प्लेलिस्टमधील मूसेवालाच्या गाण्यांच्या जागी आता प्रभ गिलची गाणी ठेवली.' तिसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'बेशरम रंग 2.0'. आणखी एक नेटकरी म्हणाला 'ती हृतिकला किस करते, पण तिच्या डोक्यात मात्र, ती रणवीरसोबत आहे.'

हेही वाचा : 'बॉबी माझ्यावर जबरदस्ती...'; 'ॲनिमल' मधल्या 'मॅरिटल रेप सीन'वर ऑनस्क्रीन पत्नी स्पष्टच बोलली

दरम्यान, दीपिका या आधी करण जोहरच्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये दिसली होती. या शोमध्ये दीपिकाला विचारण्यात आलं होतं की तिला काय वाटतं की रणवीर व्यतिरिक्त कोणासोबत तिची केमिस्ट्री चांगली दिसते? त्यावर उत्तर देत दीपिकानं उत्तर दिलं की हृतिकसोबत तिची केमिस्ट्री खूप चांगली आहे, आणि ही केमिस्ट्री फायटरमध्ये पाहायला मिळणार आहे.