'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती

Aaradhya Bachchan helps Aishwarya On Cannes 2024 Red Carpet : ऐश्वर्या रायला आराध्यानं केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी केली बिग बींच्या लेकीची स्तुती...

दिक्षा पाटील | Updated: May 17, 2024, 12:32 PM IST
'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती title=
(Photo Credit : Social Media)

Aaradhya Bachchan helps Aishwarya On Cannes 2024 Red Carpet : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या बच्चन हे दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते दोघे आता 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये दिसणार आहेत. ऐश्वर्या सध्या तिच्या हाताला झालेल्या दुखापतीला सांभाळत या फिल्म फेस्टिवलमध्ये आली आहे. तिच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर पाहून तिच्या चाहत्यांना देखील तिची चिंता वाटत होती. पण तरी कान्समध्ये दिसणारं तिचं दरवर्षी प्रमाणेचं ग्लॅमर हे कमी झालेलं नाही. 

यावेळी ऐश्वर्याचा लूक चांगलाच चर्चेत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे आराध्यानं वेधलं आहे. ऐश्वर्याच्या लूकविषयी बोलायचं झालं तर तिनं काळ्या रंगाचा गाउन परिधान केला असून त्याला एक सुंदर अशी टेल देखील आहे. ऐश्वर्यानं रेड कार्पेटवर तिचं फॅशन गोल ठरली आहे. यावेळी आराध्यानं केलेल्या कृत्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आराध्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत आराध्या ही ऐश्वर्याला चालताना मदत करताना दिसते. 

या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी आराध्या बच्चनची स्तुती करत आहेत. आराध्याला पाहून तिला किती चांगले संस्कार आहेत, असे नेटकरी बोलत आहेत. 12 वर्षांची आराध्या तिच्या आईला यावेळी मदत करताना दिसली. 12 वर्षांच्या या आराध्यानं तिच्या आईला रेड कार्पेटपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या आईला मदत केली आहे. कॅज्युअल स्टायलिश काळ्या रंगांच्या ट्रॅक सूटमध्ये आराध्या तिच्या आईला मदत करताना दिसली. एका नेटकऱ्यांनी कमेंट केली की "या गोष्टीवर विश्वास बसत नाही की आराध्या ही खरंच 12 वर्षांची आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "बच्चन कुटुंबाचे संस्कार." तिसरा नेटकरी म्हणाला, "या आधी आराध्या नेहमी ऐश्वर्याचा हात धरून चालायची... आईनं तिला सांभाळलं आणि जेव्हा आईला गरज आहे तेव्हा आराध्या ऐश्वर्याला साथ देताना दिसते. हे खरे संस्कार". 

हेही वाचा : कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?

दरम्यान, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी आराध्यानं आईला मदत केली. ऐश्वर्याला मदत करण्यासाठी 4 लोकांची टीम होती. तिच्या ग्लॅम स्कॉडच्या ग्रुपला लॉन्च करण्यावेळी स्कॉडच्या ग्रुपला तिच्या या हेवी आणि मोठी टेल असलेल्या ड्रेसला घेऊन जाताना दिसली. ऐश्वर्याचं नाव अशा भारतीय कलाकारांमध्ये येतं जे दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म फेस्टिवलमध्ये जाताना दिसते. तिच्या शिवाय उर्वशी रौतेला देखील अनेकदा या कार्यक्रमात दिसली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x