Netflix Password Sharing : नवीन वर्षात नेटफ्लिक्स युझर्स ला फटका; पासवर्ड शेअर करता येणार नाही, 'हे' आहे कारण...

 Netflix नं का घेतला मोठा निर्णय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला करणार हे बदल, युसर्जना मोठा फटका

Updated: Dec 26, 2022, 01:41 PM IST
Netflix Password Sharing : नवीन वर्षात नेटफ्लिक्स युझर्स ला फटका; पासवर्ड शेअर करता येणार नाही, 'हे' आहे कारण... title=

Netflix To end Password Sharing In 2023 : आजकाल प्रत्येक व्यक्तीला घरी बसून चित्रपट पाहायला आवडतं. आता आपल्याला घरी बसून चित्रपट पाहण्यासाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहेत. दरम्यान, सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये नेटफ्लिक्स (Netflix) हे एक आहे. नेटफ्लिक्सवर चित्रपट आणि वेब सीरिज ( Movies and Webseries on Netflix ) पाहण्यासाठी मन्थलि सब्सक्रिप्शन घेतात. बऱ्याचवेळा असं होतं की एखादी व्यक्ती सब्सक्रिप्शन घेते आणि मग आपल्या मित्रांसोबत शेअर करते. यामुळे समोरची व्यक्ती सबस्क्रिप्शन न घेता नेटफ्लिक्सवर असलेल्या सगळ्या कॉन्टेंटचा आनंद घेते. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे कंपनीचे नुकसान होते. हे पाहता नेटफ्लिक्सनं त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल अंमलात आणल्यानंतर, कोणाची कितीही इच्छा असली तरी देखील ते त्यांना अकाऊंट आणि पासवर्ड कोणासोबत शेअर करू शकणार नाही. (Netflix To end Password Sharing) 

कंपनीचे म्हणणे आहे की 100 मिलियन पेक्षा अधिक नेटफ्लिक्स युजर हे त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांकडून घेतलेले पासवर्ड वापरून शकणार नाही. पासवर्ड शेअर करण्याचा प्रकार हा 2023 मध्ये संपणार आहे. जर कोणला त्यांचे अकाऊंट शेअर करायचे असेल तर कंपनी त्यासाठी देखील पैसे देण्यास सांगेल. अमेरिकेत या सगळ्याची चाचणी करण्यात येईल. तर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला हा बदल करण्यात येऊ शकतो. Netflix To end Password Sharing Because Of 100 Million Loss) 

हेही वाचा : Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?

नेटफ्लिक्सने आधीच काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पासवर्ड शेअरिंगसाठी अतिरिक्त शुल्कची चाचणी सुरू केली आहे, सुमारे 3 डॉलर अतिरिक्त शुल्क आकारत आहे. ज्या व्यक्तीकडे सब्सक्रिप्शन आहे त्या व्यक्तीनं जर दुसऱ्या व्यक्तीला पासवर्ड आणि अकाऊंटची संपूर्ण माहिती दिली तर त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड द्यावा लागेल. हा कोड विनामुल्य नसणार आहे.

जर तुम्ही Netflix चे मन्थलि सबस्क्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर यासाठी कंपनीने सर्वात कमी 149 रुपयांचा प्लान ठेवला आहे. हा प्लॅन फक्त मोबाईलवर वापरता येईल. दुसरीकडे, जर तुम्हाला त्याचा बेसिक प्लान घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 199 रुपये, स्टँडर्ड प्लानसाठी 499 रुपये आणि प्रीमियम प्लानसाठी 649 रुपये प्रति महिना द्यावे लागतील. जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगा की कंपनीने एक जाहिरात योजना देखील लाँच केली आहे आणि त्यासाठी दरमहा 99 रुपये निश्चित केले आहेत.