अंजली भाभी नेमकी आहे कुठे, १२ वर्षानंतर ''तारक मेहता का उल्टा चष्मा'' सोडल्यानंतर?

अंजली भाभीने ही सिरिअल सोडल्याने लोकांना पहिले वाटले की, सिरिअलच्या मेकर्स सोबत वाद झाल्याने अंजली भाभीने ही सिरिअल सोडली. 

Updated: Jun 9, 2021, 09:32 PM IST
अंजली भाभी नेमकी आहे कुठे, १२ वर्षानंतर ''तारक मेहता का उल्टा चष्मा'' सोडल्यानंतर? title=

मुंबई : 'तारक मेहेताका उटला चष्मा' या टीव्ही शो ने लोकांच्या घराघरात जागा निर्माण केली आहे. जवळ-जवळ गेल्या एक दशकापासून चालत आलेल्या टिव्ही सिरियरमधील प्रत्येक व्यकितीरेखेने लोकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. त्यात तारक महेता या लेखकाच्या बायकोची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अंजली भाभीनेही लोकांच्या मनात आपली वेगळीच छवी उमटवली आहे. गोड आणि प्रेमळ स्वभावाच्या अंजली भाभीने 2020 मध्ये ही सिरिअल सोडली आहे. त्यामुळे सगळेच लोकं या व्यक्तीरेखेला टीव्हीवर मिस करत आहे.

अंजली भाभीने ही सिरिअल सोडल्याने लोकांना पहिले वाटले की, सिरिअलच्या मेकर्स सोबत वाद झाल्याने अंजली भाभीने ही सिरिअल सोडली. त्यामुळे त्यांनी अंजली भाभीला परत सिरिअलमध्ये आणण्यासाठी सांगितले. पंरतु त्याचा काही फायदा झाला नाही. कारण अंजली भाभीला परत या सिरिअलमध्ये काम करायचे नव्हते.

एका मुलाखती दरम्यान अंजली मेहेताने तिने ही सिरिअल सोडल्याचे खरे कारण सांगितले आहे. ती म्हणाली, "जेव्हा मला या सिरिअलचा रोल आला तेव्हा मी कॉन्फिडंट नव्हते. परंतु या सिरिअसमध्ये 12 वर्षे काम केल्यानंतर माझ्यासाठी ही सिरिअल खूप जवळची झाली आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सिरिअल सोडने अवघड होते. परंतु मला आता थोडा चेंज हवा आहे. आता मला असे वाटू लागले आहे की, मी बरेच काही करु शकते. त्यामुळे मी आता गुजराती सिनेम्यांकडे वळली आहे. मी हल्लीच एक गुजराती फिल्मची शूटींग पूर्ण केली आहे. मी त्यामध्ये मुख्य भूमीकेत दिसणार आहेत. या फिल्मची कथा मॉडर्न नवदूर्गा वरती आधारीत आहे."

अंजली भाभीच्या या खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना तिने ही सिरिअल का सोडली या मागचे कारणही समजले आणि त्यांना या ही गोष्टीची जाणीव झाली की, ती आता या सारिअलमध्ये दिसणार नाही.

अंजली मेहेताचे खरे नाव नेहा मेहेता आहे. तिचा जन्म 9 जून, 1978 ला गुजरातच्या भावनगरमध्ये झाला. तिने आपल्या अभिनय करिअरची सुरवात 2001 ला टीव्ही सिरिअल डॉलर बहू मधून केली. त्यानंतर तिने 2008 मध्ये संजय दत्त बरोबर  EMI या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.