Neha kakkar ला भेटून जेव्हा तिची फॅन ढसाढसा रडते, VIDEO सोशल मीडियावर Viral

सध्या सोशल मीडियावर नेहा कक्करचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 30, 2022, 03:20 PM IST
Neha kakkar ला भेटून जेव्हा तिची फॅन ढसाढसा रडते, VIDEO सोशल मीडियावर Viral title=

मुंबई : बॉलिवूडची गायिका नेहा कक्करचे आज लाखो फॅन्स आहेत. संघर्ष करत तिने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. म्हणूनच तिचा दबदबा बॉलिवूडमध्ये ही दिसतोय. तिचा आवाजाचे लाखो फॅन्स आहेत. तिच्या व्हिडिओचे लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. सोशल मीडियावर नेहमीच तिचे व्हिडिओ व्हायरल ही होतात. (Neha Kakkar hugs and consoles emotional fan)

नेहा कक्कर खूपच इमोशनल आहे. अनेक शोमध्ये याची प्रचिती तिच्या चाहत्यांना आली आहे. ज्यामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता तिची एक फॅन इमोशनल झाली आहे. जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा तिची चाहती तिला एअरपोर्टवर भेटली तिला रडू कोसळले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये नेहा कक्कर तिच्या एका चाहतीला भेटताना दिसत आहे. आपल्या आवडत्या गायिकेला पाहून चाहतीला ही रडू कोसळले. तिला पाहून नेहा कक्कर तिला सावरण्याचा प्रयत्न करते.

 

नेहा कक्कर आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. तिथे शक्य आहे तिथे ती चाहत्यांना भेटते आणि त्यांच्या सोबत फोटो देखील काढते.