खुलेआम नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचं लिपलॉक

 बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचे काही  फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Updated: Nov 23, 2021, 07:26 PM IST
खुलेआम नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचं लिपलॉक title=

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचे काही  फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नेहा कक्कर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आयफेल टॉवरसमोर उभी असलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग खुलेआम रस्त्यावर एकमेकांसोबत लिपलॉक करताना दिसत आहेत.

मोकळ्या रस्त्यावर लिपलॉक केलं
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग उघडपणे सर्वांसमोर एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. स्वतः अभिनेत्रीने तिच्या व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत नेहा कक्करने लिहिलंय की, 'प्रेमाचं शहर पॅरिस खूप सुंदर दिसत आहे. पण जेव्हा तू माझ्यासोबत असतोस, तुझ्याशिवाय नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहा रोहनप्रीतचे फोटो व्हायरल
या सुंदर कॅप्शनसोबत नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंगला फोटोंमध्ये टॅग केलं आहे. नेहा कक्करच्या पतीनेही या फोटोंवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहनप्रीतने लिहिलंय की, 'माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे प्रियं.' नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने या फोटोंना वर्षातील फोटो म्हणून संबोधले असून हार्ट इमोजी शेअर केले आहेत.