मुंबई : एमटीव्हीचा पॉप्युलर रियॅलिटी शो रोडीजच्या ऑडिशनमध्ये प्रत्येक वेळेस काही न काही आजब घडत असतं. नुकतच या ऑडिशनमध्ये हैराण करणारी बाब समोर आली. ऑडिशनसाठी रोडीजची पूर्ण टीम चंदीगड पोहोचली. शोचे परिक्षक नेहा धूपिया, रणविजय, प्रिंस नरूला आणि रफ्तार ही टीम ऑडिशन घेत होती.
दरम्यान ऑडिशनला आलेल्या तरुणाने सर्वांना हैराण केले. हर्वप्रीत असे त्या तरुणाचे नाव. 'तुम्ही शो मध्ये का येऊ इच्छिता ?' असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा त्याचे उत्तर ऐकून त्याला थेट घरचा रस्ता दाखवावा लागला.
मला नेहा धुपिया खूप आवडते, तिच्याशी मला फ्लर्ट करण्याची इच्छा होते, या शोमध्ये येण्याचे हेच कारण असल्याचे हर्वप्रीतने सांगितले. त्यापुढे त्याच्या तोडांचा पट्टा सुटला तो सुटलाच. बोलता बोलता त्याने सर्व सीमा पार केल्या.
त्याने स्वत:ची सेक्शुअल पॉवर सांगण्यास सुरूवात केली. त्याच्या या बाता ऐकून परिक्षक रागाने लाल झाले.
'तुझ्या बोलण्यावरून कळतय की महिलांबद्दल तुझ्या मनात कोणताच आदर नाही. ज्याप्रमाणे तु स्वत:ची सेक्शुअल पॉवर सांगतोय त्यावरून तुझी समज कळतायत. तुझ्यासारखा सनकी माझ्या शो मध्ये असणं मला आवडणार नाही.
तुझ ऐकून मला इथल्या महिला स्पर्धकांबद्दल भिती वाटतेय.'
नेहा धुपिया आणि इतर परिक्षकांनी त्याला खूप सुनावले. त्यानंतर शो निर्मात्यांनी हर्वप्रीतला हॉलमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.