सून आलियाच्या गाण्यावर सासूचा भन्नाट डान्स...सुनेच्या आगमनानं नीतू कपूर आहेत भलत्याच खूश

घरात सून आल्यामुळे नीतू कपूर भलत्याच खूश आहे. लग्नातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता तर त्यांनी आलियाच्या गाण्यावर बिनधास्त डान्स करत आनंद व्यक्त केला आहे

Updated: Apr 17, 2022, 11:49 AM IST
सून आलियाच्या गाण्यावर सासूचा भन्नाट डान्स...सुनेच्या आगमनानं नीतू कपूर आहेत भलत्याच खूश title=

मुंबई ः  कपूर घराण्यातला शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला..आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या चर्चा काही थांबताना दिसत नाही. पण, आता चर्चा आहे नवीनच सासूबाई बनलेल्या नीतू कपूर यांची.

घरात सून आल्यामुळे नीतू कपूर भलत्याच खूश आहे. लग्नातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता तर त्यांनी आलियाच्या गाण्यावर बिनधास्त डान्स करत आनंद व्यक्त केला आहे.

'हुनरबाज' या डान्स रियालिटी शोमध्ये नीतू कपूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमातील ढोलिडा गाण्यावर डान्स केला. नीतू कपूर यांच्यासोबत करण जोहरही थिरकताना दिसत आहे. आलियाच्या ढोलिडा गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे..

अनेक जण या गाण्यावर रिल्स बनवत असतात. मग, आलियाच्या सासूबाई तरी कशा मागे राहतील. लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्यांनी 'हुनरबाज'च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली. मग याच गाण्यावर थिरकण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही.

यावेळी त्यांनी घातलेला पेहरावही सर्वांचं लक्ष वेधणारा होता. गोल्डन पलाझो आणि त्यावर गोल्डन श्रग नीतू यांना चांगलाच शोभून दिसतोय. हुनरबाजचा हा एपिसोड आज रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे

आलिया आणि रणबीरचा शाही विवाह सोहळा 14 एप्रिलला पाली हिलमधील 'वास्तू' या बंगल्यात पार पडला. या विवाह सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण असल्याने लग्नातल्या एक-एक रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतूर आहेत. या लग्नातल्या अनेक गोष्टी गुप्त ठेवण्यासाठी मीडियालाही दूर ठेवण्यात आलं होतं