'चोली के पीछे क्या है' गाण्याला नीना गुप्ताने आधी दिला होता नकार; मग यामुळे झाली तयार

 'चोली के पीछे क्या है' हे सुपरहिट गाणं तुम्हाला माहितीच असेल. होय  'खलनायक' (1993) सिनेमातील हे तेच गाणं आहे. ज्यामध्ये माधुरीने तिच्या अदांनी सगळ्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. 

Updated: Mar 17, 2024, 07:26 PM IST
'चोली के पीछे क्या है' गाण्याला नीना गुप्ताने आधी दिला होता नकार; मग यामुळे झाली तयार title=

Choli Ke Peeche Kya Hai Song : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी त्यांचं वय 64 वर्ष असलं आजही ही अभिनेत्री  सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देतात. सोशल मीडियावरही नीना गुप्ता नेहमीच सक्रिय असतात. एका पेक्षा एक पोस्ट शेअर करुन नीना गुप्ता तिच्या चाहत्यांना हैराण करते. नीना यांना त्यांच्या वाढत्या वयाची अजिबात पर्वा नाही.  'चोली के पीछे क्या है' हे सुपरहिट गाणं तुम्हाला माहितीच असेल. होय  'खलनायक' (1993) सिनेमातील हे तेच गाणं आहे. ज्यामध्ये माधुरीने तिच्या अदांनी सगळ्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. 

या गाण्यात माधुरीसोबत निना गुप्तादेखील दिसल्या आहेत. मात्र तुम्हाला हे माहितीये का?  की, हे गाणं करायला आधी निना गुप्ताने नकार दिला होता. इतकंच काय तर या गाण्याची जेव्हा अभिनेत्रीला ऑफर देण्यात आली होती तेव्हा तिला रागही आला होता. 

'चोली के पीछे क्या है' हे गाणं करायला नीना गुप्ताने दिला होता नकार!
नीना गुप्ताने नुकतीच, कोमल नहाटाला मुलाखत दिली. दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ताने सांगितलं की, जेव्हा पहिल्यांदा खलनायकचे दिग्दर्शक सुभाष घईने चोली के पीछे क्या है ऐकवलं, तेव्हा तिने हे गाणं करायला अभिनेत्रीने साफ नकार दिला. नीनाने सांगितलं की, 'तिला असं गाणं करायचं नव्हतं, ज्यामध्ये ती माधुरीच्या मागे दिसेल, कारण ती स्वतः एक आघाडीची अभिनेत्री होती. त्यानंतर तिने सतीश कौशिक यांना गाण्यात रस नसल्याचं दिग्दर्शकाला सांगायला लावलं. इतकंच नाहीतर अभिनेत्री असूनही तिला अशा गाण्याची ऑफर दिल्याचा रागही आला होता.

नीनाने मुलाखतीत सांगितलं की,  'तिने सतीश कौशिक यांना गाणं करण्यास नकार दिला होता. कारण ती डान्सर नव्हती आणि दुसरं म्हणजे ते तिचं गाणं नव्हतं. आणि त्यात तिचा संपूर्ण डान्स नव्हता. तेव्हा सुभाष घई यांनी तिला बोलावून सांगितलं की, हे गाणं करण्यात तिचं काही नुकसान होणार नाही, कारण ते गाणं खूप हिट होणार आहे, त्यामुळे तिने ते करावं. त्यामुळे नीना गुप्ताने सुभाष घई यांचं ऐकलं आणि माधुरी दीक्षितसोबत गाणं केलं. नीना गुप्ता यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना सोशल मीडियावर नेमहीच काही ना काही शेअर करत असतात. तर अनेकदा ही अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते.