काम मिळालं नाही तर काय करणार? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय, 'घर किंवा बूट विकून...'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कामावर आणि काम मिळालं नाही तर काय करणार याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 28, 2024, 12:49 PM IST
काम मिळालं नाही तर काय करणार? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय, 'घर किंवा बूट विकून...' title=
(Photo Credit : Social Media)

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. नवाजुद्दीन त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखला जातो. नवाजुद्दीननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलंय. त्यापैकी एक म्हणजे जर त्याला चित्रपट मिळणं बंद झालं तर तो कोणाकडे काम मागायला जाणार नाही, तर रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये अभिनय करेल. 

काम मिळालं नाही तर? नवाजुद्दीन सिद्दीकीनं सांगितला पुढचा प्लॅन

नवाजुद्दीन सिद्दीकीनं Unfiltered by Samdish ला नुकतीच मुलाखत दिली होती. त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. नवाजुद्दीनला विचारण्यात आलं की कधी आयुष्यात असं झालं का की जेव्हा कोणी असं आलं आणि त्यानं खूप प्रेम केलं? कोणत्या एका व्यक्तीकडून खूप प्रेम मिळालं आहे? तर नवाजुद्दीननं सांगितलं की 'त्याला अनुराग कश्यपनं खूप प्रेम दिलं. जर उद्या माझ्याकडे काम नसेल तर माझ्यात इतकी हिंमत नाही की मी कोणाकडे जाऊन काम मागेल. मी तुमच्याकडे येऊन हे बोलेन की मला काम द्या? मी मागू शकत नाही. मी काम मागायला जाणार नाही. मी माझं घर आणि त्यात असलेल्या सगळ्या गोष्टी विकून चित्रपट बनवेल. मी बूटं विकून चित्रपट बनवेन. मला स्वत:वर इतका विश्वास आहे की सगळं काही देऊन चित्रपट बनवेन. मात्र, काम मागायला जाणार नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की 'मी कोणकडे जाऊन बोलेन की माझ्याकडे काम नाही, काम दे. मी ते तर करू शकत नाही. सॉरी. अभिनय करणं महत्त्वाचं आहे. फक्त चित्रपटांमध्ये करणं गरजेचं नाही. रस्त्यावर करेन. ट्रेनमध्ये करेन, बसमध्ये करेन.' 

हेही वाचा : आधी बॉबीकडे सेल्फीसाठी विनंती, नंतर थेट केलं KISS; चाहतीचं ते कृत्य पाहताच नेटकरी संतप्त

नवाजुद्दीनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1999 मध्ये आमिर खानच्या 'सरफरोश' मध्ये एक छोटी भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली होती. त्यात तो एका गुप्तहेराच्या भूमिकेत होता आणि कोणी त्याच्याकडे इतकं लक्ष देखील दिलं  नाही. त्यानंतर त्यानं अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र, सगळ्यात आधी 'कहानी' आणि मग अनुराग कश्यपच्या 'गॅंग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटातील त्याच्या अभिनयानं त्याला अभिनेता बनवलं. त्याच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तो 'बोलें चूडियां', 'नूरानी चेहरा', 'संगीन', 'अदभुत' आणि 'सैंधव' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.