नव्या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी

नवा सिनेमा घेऊन रजनीकांत सज्ज 

नव्या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी   title=

मुंबई : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा नुकताच 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला. अगदी पहिल्याच दिवसापासून विक्रम रचणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या 'पेटा' सिनेमाने सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लावलं आहे. पोंगल सणाच्या निमित्ताने याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. 

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे. नवाजुद्दीनने आपल्या ट्विटर हँडलवर सिनेमातील लूक शेअर केला आहे. सिनेमात नवाज सिगार सिंहच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेबद्दल नवाजला सोशल मीडियावर खूप सकारात्मक रिप्लाय मिळत आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सिनेमा 'पेटा'मध्ये रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.