Nawazuddin Siddiqui एअर होस्टेससोबत फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद : Video

नवाजचं असं रूप कुणीच पाहिलं नसेल 

Updated: May 21, 2021, 08:37 AM IST
Nawazuddin Siddiqui  एअर होस्टेससोबत फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद : Video  title=

मुंबई : नवाजुद्दी सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बॉलिवूडच्या ए-क्लास अभिनेत्यांमध्ये सहभागी झाला आहे. नवाजुद्दीन अनेकदा कॅरेक्टर भूमिका साकारत असतो. मात्र खासगी आयुष्यात नवाजुद्दीन अतिशय सामान्य आयुष्य जगताना दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडिओ तुम्हाला थक्क करेल यात शंका नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी अतिशय सामान्य व्यक्तीमत्व असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र तो खूप मनमौजी असल्याचं लोकांना माहित नाही. 

नवाजुद्दीनचं वेगळं रूप 

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)  चा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या व्हि़डिओत आपल्या स्वभावापेक्षा अगदी वेगळा वागत आहे. नवाज विमानात फ्लाइट अटेंडेंटसोबत बोलताना आणि फ्लर्ट करताना दिसले. नवाज एअर होस्टेसला बघून हसताना दिसला. एअर होस्टेस देखील नवाजला बघून हसत होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नवाजचा अंदाज पाहायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. चाहते यावर आपली मत नोंदवत आहेत. नवाजचा असा अंदाज पाहायला मिळाला नाही. पण हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल की नवाज अगदी आशिक आहे.

१९ मे रोजी नवाजचा वाढदिवस झाला. नवाजुद्दीन सिद्दिकीला प्रकाशझोतात राहणं फार आवडत नाही. त्याने आजवर अनेक चित्रपट, सीरिजमध्ये काम केले आहे. 'मंटो', 'फोटोग्राफर', 'ठाकरे', 'मांझी', 'रमन राघव २.०', 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटांतील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.