'अबॉर्शन बॅन'वर बिग बींची नातं नव्याची प्रतिक्रिया

काय म्हणाली नव्या? जाणून घ्या  

Updated: Jan 29, 2021, 09:42 AM IST
'अबॉर्शन बॅन'वर बिग बींची नातं नव्याची प्रतिक्रिया title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) गेल्या काही दिवसांपासून कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय सतत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सुरवातीला नव्याचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायवेट होतं पण आता तिने अकाउंट पब्लिक केलं आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या सर्व पोस्ट दिसातात. आता नव्याने पोलंडमध्ये गर्भपात करण्यावर पूर्णपणे बंदी घातल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

नव्याने सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला. त्यामध्ये तिने स्वतःचे विचार व्यक्त केले आहेत. 'फार दुःखद' अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. दरम्यान पोलंडमध्ये कोर्टाने एका निर्णयात पोलंडमधील गर्भपात करण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. .

कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जन्म न घेतलेलं मुल देखील एक माणूस आहे. म्हणून पोलंडच्या घटनेत त्या बालकाचं देखील संरक्षण केलं जावं. त्याला देखील जगण्याचा अधिकार आहे. बलात्कार झाल्यानंतर किंवा आईची प्रकृती स्थिर नसेल तर गर्भपाताची परवानगी कोर्टाने दिली आहे. 

पोलंडमध्ये गर्भपातावर पूर्णपणे बंदी लादल्यामुळे नागरीक संतापले आहेत. शिवाय याठिकाणी नागरिक रस्त्यांवर उतरून कायद्याला विरोध दर्शवत आहेत. नव्याने यासंदर्भातील पोस्ट शेअर केल्यामुळे ती चर्चेत आहे.