झी मराठीवर मनोरंजनाचा डबल धमाका; 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' १८ मार्चपासून भेटीला

 झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Updated: Mar 17, 2024, 04:44 PM IST
झी मराठीवर मनोरंजनाचा डबल धमाका; 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' १८ मार्चपासून भेटीला title=

मुंबई : झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत असतात. सध्या झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर आता 'नवरी मिळाले हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे'  ह्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला १८ मार्च पासून येत आहेत. हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरे म्हणजेच अक्ष....य म्हात्रे आणि राकेश बापट ह्या मालिकां मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये अक्षय म्हात्रे आकाश ची भूमिका साकारत आहे, जो दोन गोड मुलींचा बाबा आहे. तर त्याची साथ देणार आहे अक्षया हिंदाळकर, जी वसुंधरा ची भूमिका साकारत आहे. वसुंधरा ही एका मुलाची आई आहे. कसे हे दोन अपूर्ण कुटुंब पूर्ण होणार हे पाहायला मिळणार ह्या मालिकेत. 

तर दुसरीकडे 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये अभिराम जहागीरदार ची भूमिका साकारत आहे  राकेश बापट आणि त्याची साथ देत आहे वल्लरी विराज जी लीला साकारत आहे. AJ ओळखला जातो मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून , ज्याचं  व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, जो  अतिशय शिस्तबद्ध आहे  आणि ज्यात वक्तशीरपणा आहे. ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या तीन सुनांनी सुरु केली आहे. हिटलरच्या नवरीची भूमिका साकारत आहे अभिनेत्री वल्लरी विराज जिच्या भूमिकेचं नाव आहे  लीला.  लीला बहिर्मुख आहे.

सर्वांची मदत करणे हाच तिचा उद्देश असतो पण लीलाची लीला इतकी अपरंपार आहे की  मदतीसाठी दिलेला हात काही तर घोळ घालून जातो. लीला जेव्हा अभिरामला भेटेल तेव्हा काय होणार हे बघण्याची  मज्जाच वेगळी असणार.तेव्हा पाहायला विसरू नका झी मराठीवर.  जुन्या आठवणींसोबत नव्या नात्याची गोष्ट 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९.३० वा. आणि  'नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १० वा.  १८ मार्चपासून