'Tarak Mehata....' कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर असे दिसतात Nattu Kaka; तुम्हाला विश्वासचं बसणार नाही

कॅन्सर झाल्यानंतर अखेरची इच्छा व्यक्त करणाऱ्या नट्टू काका यांचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Aug 24, 2021, 09:33 AM IST
'Tarak Mehata....'  कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर असे दिसतात Nattu Kaka; तुम्हाला विश्वासचं बसणार नाही title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक सध्या कॅन्सर या गंभीर आजाराला झुंज देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली होती. आता देखील सर्वांच्या लाडक्या नट्टू काकांवर उपचार सुरू आहेत. एप्रिल महिन्या कॅन्सरच्या विळख्यात सापडल्यानंतरही ते  मालिकेची शुटिंग करत होते. आता घनश्याम यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी हे आपले नट्टू काका आहेत? यावर विश्वासचं बसत नाही. 

नट्टू काका यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. घनश्याम नायक या फोटोमध्ये आजारी दिसत आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. एवढ्या मोठ्या आजाराने ग्रासलं असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. नट्टू काका यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यासोबत त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  दरम्यान, 77 वर्षांच्या नट्टू काकांच्या गळ्यावर काही स्पॉट्स दिसले. ज्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्याची माहिती मिळाली.  चाहत्यांना देखील नट्टू काका लवकर बरे व्हावेत असं वाटत आहे. 

याच दरम्यान नट्टू काकांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. नट्टू काकांना मेकअप करूनच अखेरचा प्रवास करायचा आहे. एका कलाकाराने व्यक्त केलेली ही अखेरची इच्छा सगळ्यांचच मन हेलावणारी आहे. घनश्याम नायक यांनी आपली अखेरची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. तसेच त्यांचा अखेरचा प्रवास हा चेहऱ्याला रंग लावूनच करायचा आहे.