Naseeruddin Shah First Salary: नसिरूद्दीन शहा यांच्या अभिनयाचे आपण जण फॅन्स आहोत. आज ते कितीही मोठे सेलिब्रेटी असले तरीसुद्धा त्यांना पहिल्यांदा मिळालेला पगार वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पुर्वी कलाकारांना किती पैसे मिळत असतील याची आपल्या सारख्या लोकांनाही कुतूहल राहिल्याशिवाय राहत नाही. आज नसिरूद्दीन शहा यांचा वाढदिवस आहे तेव्हा जाणून घेऊया की नक्की त्यांची या चित्रपटसृष्टीत एन्ट्री झालीच ती केवढ्याशा पगारानं? आज अनेक कलाकार हे कोट्यवधींच्या घरात पैसे कमावताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशाच तुम्ही जर का नसिरूद्दीन शहा यांचा अहवाल पाहला तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या याचीच चर्चा सुरू झाली आहे.
तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु नसिरूद्दीन शहा यांना आपल्या पहिल्या चित्रपटासाठी 7.50 रूपये मिळाले होते. ही रक्कम ऐकून तुम्ही नक्कीच म्हणाल की इतक्या मोठ्या कलाकाराला तेव्हा इतकेच पैसै मिळाले होते? त्यातून आज तर चिप्सही 10 रूपयांच्यावर मिळतात. आज या पैशांत आपल्याला चिप्सही विकत घेता येणार नाहीत. त्यामुळे आज ते मोठे सेलिब्रेटी जरी असले तरीसुद्धा त्यांच्या या सॅलरीची आज कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. त्यावेळी समांतर चित्रपटांना नसिरूद्दीन शहा यांनी एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली होती. त्यांना अनेक पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात आले आहे. त्यातून त्यांच्या अभिनयाची सर्वत्रच चर्चा होताना दिसते. आज ते ओटीटीवरीह सक्रिय आहेत.
हेही वाचा - ''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण
हा चित्रपट होता 1967 साली आलेला 'अमन' हा. तेव्हा ते त्यात एक्स्ट्राचे आर्टिस्ट होते. 2012 साली त्यांनी 'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''मी जेव्हा सोळा वर्षांचा होतो तेव्हा मला एक्स्ट्राच्या भुमिकेसाठी अमन या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये जेव्हा राजेंद्र कुमार यांना त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी घेतले होते. तेव्हा मी बरोबर पाठी उभा होतो. मी या रोलसाठी खूप सिरियस होतो. त्यासाठी मला तेव्हा 7.50 रूपये मिळाले होते. जे मी दोन आठवडे चालवले''
हेही वाचा - Naseeruddin Shah birthday: नसिरूद्दीन शहा यांची 'ही' वादग्रस्त वक्तव्य कोण विसरेल?
नसिरूद्दीन शहा यांनी रत्ना पाठक शहा यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुलंही देखील आहेत. सोबतच ते आजही एकत्र नाटकांमधून कामं करताना दिसतात.