Nana Patekar Wedding: बॉलिवूडची लग्नसराई म्हटलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर येत ते म्हणजे भले मोठे सेट्स, आकर्षक रोषणाई आणि अवाढव्य खर्च. परंतु अशा एका लोकप्रिय अभिनेत्यानं मात्र कुठलाही खर्च न करता चक्क 750 रूपयात लग्न आणि हनिमून दोन्ही उरकलं आहे. त्यामुळे सध्या या ज्येष्ठ अभिनेत्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकदा या अभिनेत्यांना त्यांना त्यांच्या लग्नातील अवाढव्य खर्चासाठी ट्रोलही केले जाते. त्यातून त्यांचे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल झाले की त्यावरूनही त्यांना ट्रोल केले जाते आणि मग त्यावर मीम्सही केले जाते. आजकाल लग्न म्हटलं की, प्रीवेडिंग शूट, लग्नाची शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी अशा एक नाही अनेक गोष्टी या केल्या जातात. त्यामुळे अशावेळी सेलिब्रेटी वेडिंगची चांगलीच चर्चा रंगेलली असते. त्यातून सेलिब्रेटी वेडिंग म्हणजे एक पुर्णत: वेडिंग इव्हेंट असतो. त्यामुळे त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. परंतु असे अनेक अभिनेते, कलाकार आहेत जे लग्नासाठी कुठलाच खर्च किंवा थामझाम करत नाहीत.
आतापर्यंत कदाचित तुम्ही या अभिनेत्याला ओळखलंही असेल. फोटोत दिसणारे अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी निलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केले. निलकांती पाटेकर या एक बॅंक ऑफिअर होत्या. नाना पाटेकर आणि निलकांती पाटेकर यांच्या लग्नात फारच कमी खर्च आला होता. त्या पैशांत आज सिनेमाची दोन तिकीटंही येऊ शकतील. मीडिया रिपोट्सनुसार, निलकांती पाटेकर या बॅंकेत काम करत होत्या व त्याचसोबत त्यांना 25 रूपये महिना पगार मिळायचा. त्यावेळी नाना पाटेकर एका शोचे 50 रूपये कमावत होते. तेव्हाच त्यांनी आपलं लग्न आणि हनिमून 750 रूपयांत उरकले होते. परंतु सध्या समोर आलेल्या माहितीनूसार ते दोघं एकमेकांपासून वेगळेही राहतात.
तुम्ही 'आत्मविश्वास' हा चित्रपट पाहिलाच असेल. या चित्रपटातून निलकांती पाटेकर यांनी प्रमुख भुमिका केली होती. त्यांच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. त्यांना चित्रपटात त्यांच्या घरात दुय्यम स्थान देण्यात येत होते. तेव्हा कशाप्रकारे त्या आत्मविश्वासानं सगळ्यांना धडा शिकवतात. यावर हा चित्रपट आधारित होता. नाना पाटेकर यांनी अनेक भुमिका निभावल्या आहेत. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमे त्यांचे लोकप्रिय ठरले आहेत.
नाना पाटेकर हे साधी जीवनशैली फॉलो करतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. नाटक, मालिका, चित्रपट, जाहिराती यातून नाना पाटेकर आपल्याला कायमच महत्त्वाच्या भुमिकेतून दिसले आहेत. नाम फांऊडेशनमधून ते सामाजिक कार्यही करताना दिसत आहेत.