नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...

Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं? 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 2, 2023, 07:12 PM IST
नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले... title=
nana patekar open up about his fees in the vaccine war movie

Nana Patekar The Vaccine War Fees: सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे ती म्हणजे The Vaccine War या चित्रपटाची. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीपासून दूर होते. परंतु ते आपल्या सामाजिक कार्यातूनही सतत काम करत होते. 'वेलकम 3' मध्ये नाना पाटेकर दिसतील अशी अनेकांनी आशा लागून राहिली होती. परंतु या चित्रपटातून नाना पाटेकर दिसणार नसल्यानं अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. वेलकमच्या तिसऱ्या भागाची छोटीशी झलक ही सोशल मीडियावर आली होती. त्यामुळे यातही नाना पाटेकर दिसले नाहीत. यावेळी या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते आहे. परंतु सध्या नाना पाटेकर हे विवेक अग्निहोत्री यांच्या The Vaccine War मधून दिसले आहेत. त्यांनी या चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 

सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदेत बॉलिवूडवरही टीका केली होती. बॉलिवूडमध्येही घराणेशाही आहे आणि सोबतच यावेळी त्यांनी अनेकांवर नकळत टीकाही केली होती. यावेळी ते असं म्हणाले होते की बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे आणि त्यातून या चित्रपटातून लॉन्च होणारे स्टारकीड्स हे आपल्यावर लादले जातात. सध्या बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फार चांगली कमाई करत नसून सध्या या चित्रपटाची जोरात चर्चा आहे.

मागील वर्षी विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची तर सर्वत्र जोरात चर्चा होती. या चित्रपटाचा पुढील भागही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा : दुबईत फिरणारा सिद्धार्थ मिस करतोय गावचं जेवण... शेअर केली पदार्थांची यादी; नेटकरी म्हणाले, 'कांदा राहिला की'

यावेळी त्यांनी 'आजतक'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना तुम्ही या चित्रपटासाठी, म्हणजेच 'द व्हॅक्सिन वॉर'साठी किती मानधन घेतले याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ''मी या चित्रपटासाठी फक्त 20 टक्के फी घेतली. 80 टक्के फी मी माफ केली. या चित्रपटाचे टायटल आणि त्याचा विषय मला खूपच आवडला. त्यामुळे हा चित्रपट किती कमाई करतो, किती करेल याविषयी मला कल्पना नाही. पण एक गोष्ट नक्की हा चित्रपट मी खूप मनापासून केला आहे'', असं ते म्हणाले.