नागा चैतन्यला 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करायचा आहे रोमान्स

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य हा आज सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे.

Updated: Aug 16, 2022, 04:29 PM IST
नागा चैतन्यला 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करायचा आहे रोमान्स  title=

मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य हा आज सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सध्या तो आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसत आहे. त्याचबरोबर, आता त्याने बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जी ऐकून बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत खळबळ उडाली आहे.

नागा चैतन्यचं मोठं वक्तव्य
एका मुलाखतीत नागाला विचारण्यात आलं की, त्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचं आहे? यावर अभिनेत्याने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. त्याने एक नाही तर अनेक अभिनेत्रींची नावं घेतली. त्याने आलिया भट्टसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली याचबरोबर करीना कपूर खान, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफचं नावही त्याने घेतलं.  त्याला बॉलिवूडच्या प्रत्येक सुंदर अभिनेत्रीसोबत काम करायचे आहे.

या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा आहे
अभिनेता पुढे म्हणाला, 'मला आलियाचा अभिनय आवडतो. प्रियांका आणि करीनासोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती. अनेक अभिनेत्री आहेत, यादी खूप मोठी आहे. मला कतरिनाही कैफ खूप सुंदर वाटते.'' त्याचबरोबर सुष्मिता सेन ही त्याची पहिली क्रश होती. ती त्याला कधी भेटली तर तो तिला नक्कीच याबद्दल सांगेल.

नागा चैतन्यचा आगामी चित्रपट
नागाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हॉलीवूड 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात करीना कपूर खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, तो रश्मिका मंदान्नासोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.