Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी

नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 11, 2022, 09:09 AM IST
Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी title=

मुंबई  : दाक्षिणात्य (Tollywood) अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samanth Ruth Prabhu) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या दोघांची जोडी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. नागा चैतन्य आणि समांथानं गेल्या वर्षी घटस्फोट (Samantha and Naga Chaitnya Divorce) घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी विभक्त होत असल्याचं सांगितलं. त्या दोघांच्या या निर्णयानं त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. सध्या नागा चैतन्य समांथाच्या शेवटच्या निशाणीमुळे चर्चेत आला आहे. 

नागा चैतन्य सध्या 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत नागा चैतन्यनं हा खुलासा केला आहे. यावेळी त्याच्या हातावर असलेल्या टॅटूचा अर्थ काय आहे याचा खुलासा नागा चैतन्यनं केला आहे. 'हा टॅटू माझ्या लग्नाच्या तारखेसंदर्भातील आहे. मात्र अनेक चाहते त्याचा अर्थ समजून न घेताच तो काढतात. मी जेव्हा कधी माझ्या चाहत्यांच्या शरीरावर हा टॅटू पाहतो, तेव्हा मला फार वाईट वाटतं. त्यामुळे मी हा टॅटू बदलू शकतो, पण मी तसा विचार करत नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्यनं 2017 मध्ये लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर, नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागा चैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट आज 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासोबत अक्षय कुमारचा रक्षा बंधन हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. तर या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.