'धडक' सिनेमाच्या ट्रेलरची मुंबई पोलिसांनी घेतली फिरकी

धडकवर काय म्हणाले पोलीस 

'धडक' सिनेमाच्या ट्रेलरची मुंबई पोलिसांनी घेतली फिरकी  title=

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये 'धडक' या सिनेमातून डेब्यू करत आहे. धडक हा सिनेमा मराठीतील ब्लॉकब्लस्टर सैराट या सिनेमाचा रिमेक आहे. धडक या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमांत जान्हवीसोबत ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर भरपूर थट्टा करण्यात आली. आता या मस्करीत मुंबई पोलिसांनी देखील सहभाग घेतला आहे. या ट्रेलरच्या मदतीने मुंबई पोलिसांनी एक अपील केलं आहे. 

काय म्हणाले मुंबई पोलीस ?

शुक्रवारी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आहे. यामध्ये धडकच्या ट्रेलरचा एक सीन दाखवला आहे. ज्यामध्ये जान्हवी, ईशानला म्हणते की, क्या नाटक कर रहा है, मुझे देख क्यों नही रहा'. याचा वापर करत मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी ट्रॅफिक सिग्नलचे इमोशन्स दाखवले आहे. तुम्ही सिग्नलला टाळू शकत नाही. 

'धडक' हा सिनेमा मराठी सिनेमा 'सैराट' चा रिमेक असल्यामुळे चाहत्यांना जास्त अपेक्षा आहेत. या हिंदी सिनेमांत गरजेनुसार बदल केले आहेत. हा सिनेमा 20 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.