'या' लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीकडून मुंबईला GOOD BYE

फोटो पोस्ट करत व्यक्त केली भावना 

Updated: Apr 8, 2021, 02:56 PM IST
'या' लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीकडून मुंबईला GOOD BYE title=

मुंबई : मुंबई ही मायानगरी प्रत्येक कलाकाराला आकर्षित करत असते. या मायानगरीत आपली कला सादर करत मोठं कलाकार होण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं. असं असताना मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने चक्क मुंबईला Good Bye करत आहे. 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीने छोट्या पडद्यावरून पदार्पण केलं. 'कुंकू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केलेल्या मृण्मयी देशपांडेने 'अग्निहोत्र' मालिकेत देखील काम केलं आहे. त्यानंतर 'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट', 'शिकारी' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande)

मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये आपण Bye Bye Mumbai असं म्हटलं होतं. 

या फोटोत मृण्मयीने पॅकिंग करत असतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावर Time To Leave... Bye Bye Mumbai असं लिहिलं होतं. यावरून असंच वाटतं की, मृण्मयी मुंबईला सोडून जात आहे. पण मृण्मयी नक्की कुठे शिफ्ट होतेय, अशी चर्चा रंगली आहे. 

मृण्मयीने 3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल राव याच्याशी मृण्मयी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांनी गोव्यात केलं होतं. मृण्मयी आणि स्वप्निल यांच्या लग्नाचा सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. पेशवाई थाटात दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नापूर्वी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. 'मन फकीरा' या चित्रपटाचं तिने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे.