तब्बल 9 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून परतली मौनी रॉय; 'तो' फोटो शेअर केल्यानंतर चाहते काळजीत

Mouni Roy Hand Injury News:  सध्या एका अभिनेत्रीनं आपल्याला झालेल्या हातावरील इन्जूरीसाठी फोटो शेअर करत आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. यावेळी तिची ही अवस्था पाहून चाहते पुरते घाबरले आहेत. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 22, 2023, 08:01 PM IST
तब्बल 9 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून परतली मौनी रॉय; 'तो' फोटो शेअर केल्यानंतर चाहते काळजीत title=
July 22, 2023 | mouni roy shares an update on her discharged after 9 days photo goes viral on social media

Mouni Roy Hand Injury News: अनेकदा कलाकार आपल्या आजारपणाच्या कारणामुळे अथवा वेगळ्याच कुठल्यातरी गोष्टीमुळे हॉस्पिटलमध्ये अडमिट होतात. अनेकदा रूटीन चेकअपसाठीही ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि आपली योग्य ती ट्रीटमेंट करून परत येतात. अनेकदा गोष्टी असं खासकरून अभिनेत्री हॉस्पिटलमधून बाहेर आल्याच तर नानाविध गोष्टींची चर्चा होयला सुरूवात होते. कधी अभिनेत्री ही हॉस्पिटलबाहेर दिसलीच तर लगेचच ती गरोदर आहे का अशा चर्चा होयला सुरूवात होते. त्यामुळे त्यांची चांगलीच गोची होती. आता सध्या अशीच एक अभिनेत्री हॉस्पिटलमधून बाहेर आली आहे. ती बाहेर आली तो आलीच परंतु तिच्या हाताला बॅडेज लावलेले होते. त्यामुळे तिनं शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. यावेळी तिनं आपला हा इन्जूरीनंतर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे चाहते पुर्णत: घाबरले आहेत. 

या अभिनेत्रीचं नावं दुसरं तिसरं कोणी नसून आहे मौनी रॉय. यावेळी चाहत्यांना तिचा हा फोटो पाहून अक्षरक्ष: धक्का बसला आहे. मौनीला नेमकं काय झालं?, तू लवकर बरी हो. अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तर अभिनेत्री दिशा पटानीनं कमेंट करत लिहिलंय की, लवकरात लवकर बरी हो मौनी. तर अभिनेत्री मृणाल ठाकूर हिनं लिहिलंय की, बाळा काय झालं तुला? तू बरी आहेस ना? यावर तीही तिला लवकरात लवकर बरी हो असं म्हटलं आहे. निआ शर्मानंही तिला लवकरात लवकर बरं होण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या या पोस्टखाली नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यातून तिला अशा अवस्थेत पाहून चाहतेही खूप काळजीत पडले आहेत. तिला भेटण्यासाठीही ती उत्सुक होते. 

हेही वाचा - 'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

यावेळी तिनं आपले काही फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ''मी नऊ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होते. मला जी शांतता आणि आराम मिळाला आहे त्यानं मी भारावून गेले आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी घरी परतले आहे. आता मी बरी होते आहे. सध्या हळूहळू रिकव्हर होत आहे. माझी प्रकृती चांगल्या स्थितीत आहे. एक सुदृढ व आनंदी आयुष्य त्याच्या पुढे काहीच नाही अशी माझी भावना आहे. मी माझ्या जवळच्या व चांगल्या मित्रांचे खूप आभार मानते. ज्यांनी या काळात माझी काळजी घेतली त्यांची मी ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं.'' आपल्या पतीलाही टॅग करत ती म्हणाली आहे. ''तुझ्यासारखा कोणी नाही. मी नेहमी कृतज्ञ असेन. ओम नमः शिवाय''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी सध्या आपल्या पतीसोबत दुबईमध्ये आहे. तिला नक्की काय झालं आहे, याबद्दल स्पष्टता नसून त्याबद्दल नानाविध तर्क काढले जात आहेत.